शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएल डायरी

By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST

हा विजय आमच्यासाठी सकारात्मक : गंभीर

हा विजय आमच्यासाठी सकारात्मक : गंभीर
पुणे : रायजिंग पुणे सुपर जायंटस्विरुद्ध रोमहर्षक सामन्यात २ गडी राखून विजय मिळवल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीर याने हा विजय खूप महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक असल्याचे सांगितले. गंभीरने सामनावीर ठरलेल्या सूर्यकुमारची प्रशंसा केली. सूर्यकुमारने ज्याप्रमाणे फलंदाजी केली ती अविश्वसनीय होती. मनीष पांडे संघात नसणे खूप मोठा धक्का होता; परंतु सूर्यकुमारमुळे आम्हाला अनेक पर्याय उपलब्ध झाले. युसूफ पठाणनेही चांगली कामगिरी केली, असे गंभीरने म्हटले. आम्ही चांगली गोलंदाजी केली नाही. अखेरच्या तीन-चार षटकांत खूप धावा खर्च केल्या. आम्हाला आणखी कठोर होण्याची आवश्यकता होती, असे गंभीर म्हणाला.

कर्णधाराच्या अपेक्षेला उतरलो : सूर्यकुमार
पुणे : आपल्या फलंदाजीची हीच पद्धत असून संघाचा कर्णधार गौतम गंभीरनेदेखील आपला नैसर्गिक खेळ करण्यास सांगितले आणि त्याच्या अपेक्षेला खरे उतरलो, असे रायजिंग पुणे सुपरजायंटस् संघाविरुद्ध आयपीएल लढतीत रविवारी ६0 धावांची शानदार खेळी करणारा सामनावीर कोलकाता नाईट रायडर्सच्या सूर्यकुमार यादवने सांगितले.
सूर्यकुमारने ४९ चेंडूंतील ६ चौकार व २ षटकारांसह ६0 धावांची खेळी केली. त्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने रोमहर्षक लढतीत रायजिंग पुणे सुपरजायंटस्वर दोन विकेटस्ने विजय मिळवला. सूर्यकुमारची ही आयपीएल कारकीर्दीतील सवार्ेत्तम खेळी आहे. त्याने आयपीएल कारकीर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. सामन्यानंतर सूर्यकुमारने सांगितले, कर्णधाराने आपला नैसर्गिक खेळ करण्याचे सांगितले आणि त्याच्या अपेक्षेनुरूप आपण कामगिरी केली. आधीच्या सामन्यातील फॉर्म कायम ठेवल्याचाही मला आनंद वाटतोय.