शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

दालमियांच्या अनुपस्थितीत आयपीएल

By admin | Updated: July 19, 2015 01:01 IST

स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दणका दिल्यामुळे संकटात सापडलेल्या इंडियन प्रीमियर लीग संचालन परिषदेची रविवारी येथे महत्त्वपूर्ण बैठक होत आहे.

मुंबई : स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दणका दिल्यामुळे संकटात सापडलेल्या इंडियन प्रीमियर लीग संचालन परिषदेची रविवारी येथे महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. राजस्थान आणि चेन्नई संघावरील निलंबनावर चर्चा, तसेच आयपीएलबाबत नवे धोरण आखण्यासाठी बोलविण्यात येणाऱ्या बैठकीत बोर्डाचे अध्यक्ष खुद्द जगमोहन दालमिया उपस्थित राहणार नसल्याने तर्कवितर्कांना पेव फुटले आहे.राजीव शुक्ला यांच्या मार्गदर्शनात ही बैठक होईल. त्यात लोढा समितीने उपस्थित केलेल्या सर्व पैलूंवर चर्चा होणार आहे. चेन्नई, तसेच राजस्थानला त्यांचे अधिकारी गुरुनाथ मयप्पन, तसेच राज कुंद्रा हे फिक्सिंगमध्ये दोषी आढळल्याने दोन्ही संघांवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. कुंद्रा आणि मयप्पन यांच्यावर आजन्म बंदी घातल्यानंतर आयपीएल संचालन परिषदेला असे गैरप्रकार टाळण्यासाठी यापुढे नवे धोरण आखावे लागणार आहे. याशिवाय पदाधिकाऱ्यांच्या दुहेरी भूमिकेवरदेखील चर्चा होणार आहे. राजीव शुक्ला यांनी यंदा आठ संघांसह लीग आणखी लोकप्रिय ठरेल, असा विश्वास नुकताच व्यक्त केला होता. याशिवाय दोन्ही संघांना बीसीसीआयच्या नियंत्रणाखाली खेळविण्याचा विचार त्यांनी बोलून दाखविला होता. या पर्यायांवरदेखील बैठकीत विचार केला जाईल. सट्टेबाजी व स्पॉट फिक्सिंगप्रकरणी २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीचे प्रमुख न्या. मुकुल मुदगल यांनी एका मुलाखतीत ‘दोन नव्या संघांना कायदेशीर निविदा काढून जोडले जाऊ शकते. या संघात निलंबित चेन्नई आणि राजस्थानच्या खेळाडूंना लोन (फुटबॉल शैलीत)वर घेता येईल असे म्हटले होते. हे संघ दोन वर्षांच्या निलंबनानंतर पुन्हा स्वत:च्या मूळ संघात परत जाऊ शकतात.