ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबध्द माऱ्यापुढे पंजाबची तगडी फलंदाजी सपसेशल फेल ठरली, एकाही फलंदाजाला आपल्या लौकीकास खेळी करता आली नाही. पंजाबने निर्धारित २० षटकात ९ गड्यांच्या मोबदल्यात १११ धावा केल्या आहेत. दिल्लीला विजयासाठी ११२ धावांच आव्हान आहे.
दिल्लीकडून अमित मिश्राने धारधार गोलंदाजी करताना ३ षटकात ११ धावा देत पंजाबच्या ४ फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. मनन व्होरा(३२), मोहित शर्मा (१५), शॉन मार्श(१३), अक्षर पटेल(११) आणि प्रदीप साहू(१८) यांचा अपवात वगळता एकाही फलंदाजाला २ आकडी धावसंख्या पार करता आली नाही. प्रदीप साहूने शेवटच्या षटकात १३ धावा वसूल करत संघाची धावसंख्या १०० च्या पुढे नेहली. विजय आणि शहा धावबाद झाले. जयंत यादव, झहीर खान, आणि ख्रिस मॉरिसने प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.
आपापले सलामीचे सामने गमावणारे दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब आज परस्परांविरुद्ध खेळत आहेत. घरच्या मैदानावर विजयी पथावर येण्याचे दिल्लीचे डावपेच असतील. मागच्या सत्रात तळाच्या स्थानावर राहिलेल्या दिल्ली आणि पंजाबला सलामीला विजयाची आशा होती; पण दोन्ही संघांना अनुक्रमे केकेआर आणि गुजरात लॉयन्सकडून मार खावा लागला.