शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएल ८ संघांसह यशस्वी होईल : शुक्ला

By admin | Updated: July 17, 2015 03:31 IST

वादग्रस्त ठरलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या(आयपीएल) भविष्याची फारशी काळजी करण्याची गरज नाही. दोन संघांवर बंदी आली, तरी आठ संघांसह ही लीग

कोलकता : वादग्रस्त ठरलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या(आयपीएल) भविष्याची फारशी काळजी करण्याची गरज नाही. दोन संघांवर बंदी आली, तरी आठ संघांसह ही लीग कमालीची यशस्वी आणि लोकप्रिय होईल, असा विश्वास आयपीएल चेअरमन राजीव शुक्ला यांनी व्यक्त केला.राजस्थान आणि चेन्नई संघ दोन वर्षांसाठी बाद झाल्याने आयपीएलच्या भविष्याबाबत शुक्लांवर प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. यावर ते म्हणाले, की आयपीएल यशस्वी प्रॉडक्ट असल्याने दोन संघांची गच्छंती स्पर्धेचे स्वरूप खराब करू शकत नाही. सहा संघांसह आम्ही स्पर्धा आयोजित करू शकत नाही. पुढील सत्रात किमान आठ संघ असतील. अनेक पर्याय उपलब्ध आहेत, मुंबईत रविवारी आयपीएल संचालन परिषदेची बैठक त्यासाठीच आयोजित करण्यात येत आहे. संचालन परिषदेच्या बैठकीत ज्या बाबींवर विचार होईल, त्यात दोन्ही निलंबित संघ बीसीसीआयच्या अधिकारात काम करू शकतात का, याविषयी चर्चा होईल. यासाठी जबाबदार व्यक्तींची नियुक्ती शक्य आहे.बीसीसीआयने चेन्नई आणि राजस्थानवर नियंत्रण राखले तरी पदाधिकाऱ्यांच्या दुहेरी भूमिकेबद्दल काय, असा सवाल करताच शुक्ला म्हणाले, की दुटप्पीपणाचा प्रश्नच उद्भवत नाही. आयपीएल बीसीसीआयच्या अखत्यारीत सुरू आहेच. यासाठी दोन मार्ग आहेत. एकतर खेळाडूंचा पारदर्शी लिलाव आणि दुसरा संघांचे व्यवस्थापन! विश्वासपात्र व्यक्तींची व्यवस्थापन पाहण्यासाठी नियुक्ती केली जाईल.कोची फ्रॅन्चायसीच्या पुनरागमनाबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात शुक्ला म्हणाले, की न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्यावर कायदेशीर मत घेतल्यानंतर अपील करू. चेन्नई आणि राजस्थानवर आजन्म बंदी घातली जाईल का, या प्रश्नाच्या उत्तरात शुक्ला यांनी उत्तर देण्याचे टाळले. (वृत्तसंस्था)