नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या आठव्या पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव १६ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे होणार आहे. आयपीएल संचालन परिषदेचे सदस्य आणि आयपीएल कमिशनर रंजीब बिस्वाल म्हणाले, ‘‘२०१५ च्या पेप्सी आयपीएल खेळाडूंच्या लिलावाच्या घोषणेद्वारे जगातील सर्वांत मोठ्या स्पर्धांपैकी एक असलेल्या आयपीएल स्पर्धेचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. यंदादेखील फ्रॅन्चायसी संघ अनेक मोठ्या नावांवर बोली लावण्याची त्यांच्याकडे संधी राहील.’’ (वृत्तसंस्था)
आयपीएल-८ चा लिलाव १६ फेब्रुवारीला
By admin | Updated: January 31, 2015 03:33 IST