शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
4
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
5
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
6
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
7
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
8
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
9
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
10
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
11
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
12
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
13
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
14
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
15
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
16
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
17
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
18
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
19
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
20
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी

IPL 2017 : प्रीती झिंटा आणि एक्स बॉयफ्रेंड नेस वाडिया आले एकत्र

By admin | Updated: April 12, 2017 16:18 IST

बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड नेस वाडिया यांच्यातील हाडवैर आता संपले असून, दोघांमधील संबंध हळूहळू सामान्य होत आहेत.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 12 - बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड नेस वाडिया यांच्यातील हाडवैर आता संपले असून, दोघांमधील संबंध हळूहळू सामान्य होत आहेत. आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर विजय मिळवल्यानंतर दोघांनी एकत्र येऊन संघाचा विजय साजरा केल्याची माहिती आहे. पिंकविला वेबसाईटने  दिलेल्या वृत्तानुसार किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सामना सुरु असताना दोघे समोरासमोर आले. 
 
त्यावेळी दोघांच्याही चेह-यावर हास्य होते. सामना संपल्यानंतर दोघांनी चर्चाही केली. किंग्ज इलेव्हन पंजाब संघामध्ये प्रीती आणि नेस दोघांची मालकी आहे. हाशिम अमला आणि कर्णधार ग्लेन मॅक्सवेल यांच्या फलंदाजीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने बंगळुरुवर आठ विकेटने दणदणीत विजय मिळवला. प्रीतीने तिच्या इन्स्टाग्राम अकांऊटवर विजयाच्या क्षणाचे काही फोटो शेअर केले आहेत. 
 
तीनवर्षांपूर्वी प्रीती आणि नेसमध्ये झालेला वाद बराच गाजला होता. 2009 मध्ये प्रीती आणि नेसमधील प्रेमसंबंध संपुष्टात आले. जवळपास चार वर्ष दोघे रिलेशनशीपमध्ये होते. 2014 मध्ये वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या प्लेऑफच्या सामन्याच्यावेळी प्रीती आणि नेसमध्ये जोरदार वादावादी झाली होती. प्रीतीने नेसवर थेट मारहाण आणि विनयभंगाचे आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली होती. 
 
तिने फेसबुकवरुन या संपूर्ण प्रकरणाबद्दल भाष्य केले होते. नेसला मी थांबवण्याचा प्रयत्न केला पण उलट त्याने मला धमकावले असे तिने एफआयआरमध्ये म्हटले होते. ही संपूर्ण घटना प्रेक्षकांसमोर घडली होती. पण आता हा वाद संपला आहे. प्रीती फेब्रुवारी 2016 मध्ये लॉस एंजल्सस्थित जीनी गुडीनाऊजबरोबर विवाहबद्ध झाली.