शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

IPL -10 : वाह..! सचिन, बिग बीकडून ऋषभ पंतचे कौतुक

By admin | Updated: May 5, 2017 12:53 IST

ऋषभ पंतने केलेली तुफान फलंदाजी पाहून खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सुद्धा त्याचे कौतुक करत आयपीएलच्या सर्व दहा पर्वातील फलंदाजाच्या खेळी पाहिल्या

ऑनलाइन लोकमत  
मुंबई, दि. 05 - आयपीएलच्या दहाव्या पर्वात दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि  गुजरात लायन्स यांच्यातील काल झालेल्या लढतील दिल्ली डेअरडेव्हिल्सचा ऋषभ पंत याने झुंझार खेळी केली. त्याने केलेली खेळी पाहून क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सुद्धा भारावून केला. 
गुजरात लायन्स विरुद्धच्या या सामन्यात ऋषभ पंतने अवघ्या 43 चेंडूत 97 धावांची दमदार खेळी करत उपस्थितांची मने जिंकली. तसेच, ऋषभ पंतने केलेली तुफान फलंदाजी पाहून खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सुद्धा त्याचे कौतुक करत आयपीएलच्या सर्व दहा पर्वातील फलंदाजाच्या खेळी पाहिल्या, तरी ही यामधील सर्वोत्तम खेळी असल्याचे सांगितले. याचबरोबर, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी सुद्धा ऋषभ पंतचे ट्विट करुन कौतुक केले आहे. ते म्हणाले, भन्नाट खेळी. 100 धावा न केल्याचं दु:ख नाही. आमच्यासाठी हे शतकापेक्षा जास्त आहे.
दरम्यान, फिरोझशाह कोटला स्टेडियवर काल झालेल्या या सामन्यात दिल्लीकरांनी चांगली सुरुवात करताना गुजरातला झटपट दोन धक्के दिले. मात्र, नंतर गुजरातचा कर्णधार सुरेश रैना व दिनेश कार्तिक यांनी गुजरातला 20 षटकांत 7 बाद 208 धावांची मजबूत मजल मारून दिली. या वेळी, दिल्लीच्या हातून हा सामना निघून गेल्याचेच चित्र दिसत होते. परंतु, सॅमसन - पंत यांंच्या जोरावर दिल्लीने 17.3 षटकांतच बाजी मारताना 3 बाद 214 धावा केल्या. 
कर्णधार करुण नायर (12) अपयशी ठरल्यानंतर सॅमसन - पंत यांनी 143 धावांची तुफानी भागीदारी करून दिल्लीला विजयी मार्गावर आणले. सॅमसनने 31 चेंडंूत 7 षटकारांचा नजराणा पेश करून 61धावा कुटल्या. दुसरीकडे, पंतने 43 चेंडूंत 97 धावांची वादळी खेळी केली. विशेष म्हणजे अनुभवी रवींद्र जडेजावर हल्ला चढवताना या दोघांनी त्याला 2 षटकांत 28 धावांचा चोप दिला. हे दोघे बाद झाल्यनंतर श्रेयस अय्यर व कोरी अँडरसन यांनी दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पंत शतकापासून केवळ 3 धावा दूर असताना बाद झाला.  तत्पूर्वी, द्वेन स्मिथ - ब्रेंडन मॅक्युलम ही आक्रमक सलामी जोडी स्वस्तात परतल्यानंतर रैनाने केलेल्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर गुजरातने धावांचा डोंगर रचला. 
स्मिथ (9) आणि मॅक्युलम (1) स्वस्तात परतल्याने गुजरातची दुसऱ्याच षटकात 2 बाद 10 धावा अशी अवस्था झाली होती. मात्र, रैनाने सगळी सूत्रे आपल्याकडे घेत चौफेर फटकेबाजी करत 43 चेंडूत 5 चौकार व 4 षटकारांसह 77 धावांची खेळी केली. रैनानंतर कार्तिकने आक्रमक पवित्रा घेत 34 चेंडूंत 5 चौकार व 5 षटकारांसह 65 धावा काढल्या. अखेरच्या काही षटकांमध्ये रवींद्र जडेजाने (7 चेंडूंत 18*) केलेल्या फटकेबाजीमुळे गुजरातने दोनशेचा पल्ला पार केला.