शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

IPL 10- प्ले आॅफसाठी पंजाबची धडपड

By admin | Updated: May 7, 2017 17:35 IST

आयपीएल १० च्या गुणतक्त्यात किंग्ज इलेव्हन पंजाब पाचव्या स्थानावर आहे.

आॅनलाइन लोकमतमोहाली, दि. 7 - आयपीएल १० च्या गुणतक्त्यात किंग्ज इलेव्हन पंजाब पाचव्या स्थानावर आहे. पंजाबचा संघ प्ले आॅफसाठी प्रयत्नशील आहे. चौथ्या स्थानावर असलेल्या सनरायजर्स हैदराबादचे १२ सामन्यात १३ गुण असल्याने पंजाबला प्लेआॅफचीसंधी आहे. मात्र त्यासाठी त्यांना प्रत्येक सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे. थोड्याच वेळात पंजाबचा सामना गुजरात लायन्ससोबत होणार आहे. आयपीएलच्या प्ले आॅफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या गुजरात लायन्स ८ वाजता मोहालीतील स्टेडिअमवर पंजाबसोबत लढणार आहे. होम ग्राउंडवर पंजाबचे पारडे जड असले. तरी या स्पर्धेतील गुजरातच्या फलंदाजांची कामगिरी मॅक्सवेल आणि पंजाबचे गोलंदाज नजरेआड करु शकणार नाही. मॅकक्युलम अपयशी ठरल्यानंतरही रैना आणि कार्तिक यांच्या दमदार खेळीने दिल्ली विरोधात २०९ धावांचा डोंगर उभा करण्यात गुजरातला यश आले होते. मात्र त्याच वेळी हे गुजरातचे गोलंदाज पेलू शकले नाहीत. गुजरातच्या अनुभवहीन आणि सुमार गोलंदाजीचा फटका बसला आणि प्ले आॅफची अखेरची संधीही त्यांच्या हातून निसटली.या उलट पंजाबची गोलंदाजी मजबूत आहे. संदीप शर्माने मागच्या सामन्यात आरसीबीच्या धुरंधरांना नाचवले होते. त्याने एकाच सामन्यात कोहली, गेल आणि डिव्हिलियर्स यांना बाद करण्याची अफलातून कामगिरी केली होती. आतापर्यंत अशी कामगिरी इतर कोणत्याही गोलंदाजाला जमली नव्हती. त्यामुळेच पंजाबला विजय सोपा झाला होता. अष्टपैलु अक्षर पटेल हा प्रतिस्पर्धी संघासाठी केव्हाही धोकादायक ठरू शकतो. अखेरच्या क्षणी फटकेबाजी करुन तो संघाची धावसंख्या वाढवण्यात नेहमीच यशस्वी झाला आहे. त्यासोबतच अमला, मार्टिन गुप्टील, शॉन मार्श हे संघासाठी मोठी धावसंख्या उभारु शकतात.

वरुण अ‍ॅरॉन आणि मोहित शर्माला या सामन्यात आपल्या गोलंदाजीत अचूक टप्पा ठेवावा लागेल. स्वैर गोलंदाजीवर गुजरात फलंदाज धावा वसुल करण्यात तरबेज आहेत. गुजरात देखील या सामन्यात विजय मिळवण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे पंजाबला गुजरातपासून सावध रहावे लागेल. अन्यथा ते देखील प्ले आॅफच्या शर्यतीतून बाहेर व्हावे लागेल.