शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

IPL 10 : धोनीसोबत खेळणार मुंबईकर शार्दूल ठाकूर

By admin | Updated: March 6, 2017 21:10 IST

शार्दूल ठाकूर याआधी किंग्ज इलेव्हन पंजाब संघात होता. शार्दूल ठाकूरला किंग्स इलेव्हन पंजाब संघाकडून पुणे सुपरजायंट्सनी विकत घेतलं

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 6 : इंडियन प्रीमीयर लीग (आयपीएल)मधील स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करत असलेल्या रायजिंग पुणे सुपरजॉइंट्स या संघाने दहाव्या सत्रात मुंबई रणजी संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला आपल्या चमूमध्ये घेतले आहे. पाच एप्रिल ते २१ मेदरम्यान होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यात शार्दुलला आपल्या संघात स्थान दिले आहे. शार्दूल ठाकूर याआधी किंग्ज इलेव्हन पंजाब संघात होता. शार्दूल ठाकूरला किंग्स इलेव्हन पंजाब संघाकडून पुणे सुपरजायंट्सनी विकत घेतलं. किंग्ज इलेव्हन पंजाबने शार्दूल ठाकूरला 2014 मध्ये आयपीएल खेळाडूंच्या लिलावात खरेदी केले होते. आरपीएसने याआधी दिल्ली डेअरडेव्हिल्सचा फलंदाज मयंक अग्रवाललादेखील संघात घेतले आहे.शार्दुलने सलग दोन रणजी मोसमात चमकदार कामगिरीसह सर्वांचे लक्ष वेधले. 2014-15 साली त्याने 48 बळी घेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये संयुक्तपणे अग्रस्थान पटकावले होते. तर यानंतर 2015-16 मोसमात शादुलने 41 बळी घेत मुंबईला 41व्यांदा रणजी चॅम्पियन बनविण्यात मोलाचे योगदान दिले. शार्दुलने 37 प्रथम श्रेणी सामन्यांत 133 बळी मिळवले आहेत.इंडियन प्रीमियर लीगच्या दहाव्या सत्रासाठी खेळाडूंचा लिलाव 20 फेब्रुवारी रोजी पार पडला. आयपीएल-10 स्पर्धेचा थरार 29 मार्चला समाप्त होणाऱ्या ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेनंतर 5 एप्रिलपासून सुरू होणार आहे. तर 21 मेला स्पर्धेतील अखेरचा सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. दहा वर्षांतील ही अखेरची स्पर्धा आहे. तब्बल 47 दिवस हे सामने खेळवले जाणार आहेत. प्रत्येक संघ 14 सामने खेळेल. यातील 7 सामने त्या संघाच्या घरच्या मैदानावर खेळवले जातील. आरपीएसचा संघ पुढीलप्रमाणे : महेंद्र सिंह धोनी, अजिंक्य रहाणे, स्टीव्ह स्मिथ, मिशेल मार्श, रविचंद्रन अश्विन, फाफ डू प्लेसिस, शार्दूल ठाकूर, अ‍ॅडम जंपा, अंकित शर्मा, अंकुश बेन्स, अशोक डिंडा, बाबा अपराजित, बेन स्टोक्स, डॅनियल क्रिस्टियन, दीपक चाहर, ईश्वर पांडे, जसकरण सिंह, जयदेव उनाडकट, लोकी फर्ग्युसन, मनोज तिवारी, मयंक अग्रवाल, मिलिंद टंडन, राहुल अजय त्रिपाठी, राहुल चाहर, रजत भाटिया, सौरभ कुमार आणि उस्मान ख्वाजा.