शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

IPL 10 - धोनीच्या कामगिरीवर नजर

By admin | Updated: April 22, 2017 14:05 IST

कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा महेंद्र सिंह धोनी सध्या फॉर्र्मच्या बाहेर आहे. त्याच्या खेळीला बहार यावा, हीच त्याच्या तमाम फॅन्सची इच्छा असेल.

- आकाश नेवे, ऑनलाइन लोकमतकॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा महेंद्र सिंह धोनी सध्या फॉर्र्मच्या बाहेर आहे. त्याच्या खेळीला बहार यावा, हीच त्याच्या तमाम फॅन्सची इच्छा असेल. आणि गरजेच्या वेळी तो आपल्या संघासाठी उपयुक्त खेळीदेखील करतो. आता अशीच गरज धोनीच्या पुणे सुपर जायंट्स संघाला आहे. पुण्याचा संघ गुणतक्त्यात आठव्या स्थानावर आहे. स्पर्धेत आव्हान टिकवून ठेवण्यासाठी पुणे संघाला गरज आहे ती आजच्या सामन्यात विजय मिळवण्याची. आज थोड्याच वेळात रायझिंग पुणे सुपरजायंट्स विरुद्ध बलाढ्य सनरायजर्स हैदराबाद असा सामना आहे. आयपीएलच्या या सत्रात पुण्याची फलंदाजी रहाणे आणि स्मिथ यांच्या बाहेर फार गेली नाही. २८ ही या स्पर्र्धेतील धोनीची सर्र्वाधिक धावसंख्या आहे. राहुल त्रिपाठी आणि बेन स्टोंक्स यांनी धावा केल्या. मात्र त्या नेहमीच अपुऱ्या पडल्या. पुण्याच्या गोलंदाजीतही धार नाही. अशोक दिंडा या सत्रात महागडा गोलंदाज ठरला. त्यासोबतच बेन स्टोंक्सला फारशी चमक दाखवता आली नाही. नाही म्हणायला इम्रान ताहीरने आतापर्यंच चांगली गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना अडचणीत आणले आहे. पण त्याला इतर गोलंदाजांची साथ लाभली नाही. शार्दुल ठाकूरला चमकदार कामगिरी करावी लागेल.

या उलट स्थिती सनरायजर्स संघ मजबूत आहे. डेव्हिड वॉर्नर, शिखर धवन, युवराज सिंह अशा फॉर्ममध्ये असलेल्या तगड्या फलंदाजांची फौज हैदराबादकडे आहे. शिखर आणि वॉर्नर हे नेहमीच संघाला चांगली सुरुवात करून देण्यात यशस्वी ठरतात.दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत स्पर्धेत २०० च्या वर धावा केल्या आहेत. त्यासोबतच भुवनेश्वर कुमारची भेदक गोलंदाजी प्रतिस्पर्ध्यांना नमोहरम करते. त्याने आतापर्यंत १५ गडी घेतले असून त्याच्याकडे पर्पल कॅपही आहे. त्याच्या जोडीला अफगाणिस्तानचा युवा प्रतिभावान राशिद खान आहे. त्यानेदेखील आतापर्यंत नऊ बळी घेतले आहेत.