शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
4
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
5
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
6
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
7
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
8
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
9
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
10
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
11
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
12
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
13
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
14
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
15
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
16
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
17
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
18
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
19
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
20
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

आयपीएल 10 - मुंबईपुढे दिल्लीची दाणादाण

By admin | Updated: May 6, 2017 23:19 IST

लँडल सिमॉन्स आणि कायरन पोलार्डच्या तुफानी फटकेबाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने आयपीएलमध्ये आज झालेल्या लढतीत

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, 6 - लँडल सिमॉन्स आणि  कायरन पोलार्डच्या तुफानी फटकेबाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने आयपीएलमध्ये आज झालेल्या लढतीत दिल्ली डेअरडेव्हिल्सचा 146 धावांनी धुव्वा उडवला. मुंबईने आज मिळवलेला विजय आयपीएलमध्ये धावांच्या अंतराने मिळवलेला सर्वात मोठा विजय ठरला आहे या विजयासह मुंबईने नऊ विजय आणि 18 गुणांसह आयपीएल-10 च्या गुणतालिकेती अव्वलस्थान कायम राखले.
 
गुजरातविरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्लीने दोनशेहून अधिक धावांच्या आव्हानाचा लिलया पाठलाग केला होता. त्यामुळे आजही त्यांच्याकडून तशाच कामगिरीची अपेक्षा होती. पण मुंबईने विजयासाठी दिलेल्या 213 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची फलंदाजी सुरुवातीपासूनच कोलमडली. मलिंंगा, करण शर्मा आणि हरभजनच्या भेदक माऱ्यासमोर दिल्लीच्या एकाही फलंदाजाला तग धरता आला नाही. अखेर 14व्या षटकात त्यांचा संपूर्ण संघ अवघ्या 66 धावांत गारद झाला. मुंबईकडून कर्ण शर्मा आणि हरभजन सिंगने प्रत्येकी तीन गडी बाद केले. तर मलिंगाला दोन बळी मिळाले. दिल्लीकडून सर्वाधिक 21 धावा करुण नायरने काढल्या.
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणाऱ्या दिल्लीला आज पोलार्ड आणि सिमॉन्स वादळाने चांगलंच झोडून काढलं. मुंबई इंडियन्सने तुफान फलंदाजी करत दिल्लीसमोर बलाढ्या 212 धावांचं आव्हान ठेवलं आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सने सुरुवातीपासून फटकेबाजी करायला सुरुवात केली. सिमॉन्सने आणि पार्थिवने संघाला योग्य सुरुवात मिळवून दिली. मात्र पार्थिव आणि रोहित शर्मा मोठी खेळी करु शकले नाही. पार्थिवने 25 तर रोहित शर्माने 10 धावा केल्या. आधी रोहीत सिमॉन्स आणि नंतर पोलार्डने केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे दिल्लीची चांगलीच दाणादाण उडाली. 
 
सिमॉन्सने 43 चेंडूत 66 धावा केल्या, तर पोलार्डने 35 चेंडूत नाबाद 63 धावा केल्या. हार्दिक पांड्याही जबरदस्त फॉर्ममध्ये असून शेवटच्या ओव्हर्समध्ये त्यानेही चांगलेच फटके लगावले. हार्दिकने 14 चेंडूत 29 धावा केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये एकूण 23 धावा फटकावल्या गेल्या.