शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

IPL 10 - पंजाबची प्ले आॅफसाठी धडपड

By admin | Updated: May 5, 2017 15:52 IST

किंग्ज इलेव्हन पंजाबने प्ले आॅफच्या प्रवेशासाठी धडपड करत आहे. त्यांच्यासमोर आज आव्हान आहे ते तळाच्या स्थानावर असलेल्या रॉयल चँलेंजर्स बंगळुरूचे. आरसीबीच्या होम ग्राउंडवर थोड्याच वेळात होत

आॅनलाइन लोकमत

बंगळुरु, दि. 05 - किंग्ज इलेव्हन पंजाबने प्ले आॅफच्या प्रवेशासाठी धडपड करत आहे. त्यांच्यासमोर आज आव्हान आहे ते तळाच्या स्थानावर असलेल्या रॉयल चँलेंजर्स बंगळुरूचे. आरसीबीच्या होम ग्राउंडवर थोड्याच वेळात होत असलेल्या सामन्यात विराटसेना पंजाबसमोर आव्हान उभे करते का हे पाहणेच महत्त्वाचे ठरेल. आरसीबी या स्पर्धेतून बाहेर पडली आहे. मात्र उरलेले सामने जिंकून विराट या स्पर्धेतून काही चांगल्या आठवणी घेऊन जाऊ इच्छित असेल. आरपीएस विरोधातील सामन्यात काही फरकाने विजय हुकला आणि या गेल्या वेळच्या उपविजेत्या संघाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. पंजाबची स्थिती तळ््यात मळ््यात आहे. ९ सामन्यात पंजाबचे ८ गुण असले. तरी चौथ्या स्थानावर असलेल्या हैदराबादचे १३ गुण आहेत. त्यामुळे प्ले आॅफ गाठण्यासाठी पंजाबला उर्वरीत सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागेल. त्यातच काल झालेल्या सामन्यात दिल्लीने प्लेआॅफच्या आशांना विजयासह बळ दिले. हे पंजाबला विसरून चालणार नाही. विराटच्या सेनेत डिव्हिलियर्स, जाधव, गेल यांच्यासारखे स्फोटक फलंदाज आहेत त्यासोबतच चहल, अनिकेत चौधरी यांच्यासारखे दमदार गोलंदाज देखील आहेत. स्टुअर्ट बिन्नी संघाला आवश्यक असताना चांगली कामगिरी करतो. पवन नेगीने या स्पर्धेत आरसीबीकडून सर्वात फायदेशीर गोलंदाजी केली आहे. गरजेच्या वेळी प्रतिस्पर्धी संघाच्या धावा तो रोखू शकतो. तसेच बळी घेण्यातही मागे नाही. गेल्या स्पर्धेपेक्षा या स्पर्धेत त्याची कामगिरी नक्कीच सुधारली आहे. दिल्ली विरोधात मार्टिन गुप्टीलने केलेली खेळी विराट आणि आरसीबी संघ व्यवस्थापन नजरे आड करणार नाही. आमलाही चांगलाच फॉर्ममध्ये तो केव्हाही प्रतिस्पर्ध्याला नमोहराम करु शकतो. किंग्ज इलेव्हनचा कर्णधार ग्लेन मॅक्सवेल हा वादळ आहे. त्याचा दिवस असला की क्रिकेटच्या सर्व प्रकारात प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण उडवण्यास सक्षम आहे.