शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

IPL 10 - पुणेकरांना दिल्लीचे आव्हान

By admin | Updated: May 12, 2017 18:11 IST

दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर आज रात्री आठ वाजता अनुभवहीन दिल्ली डेअरडेविल्सचे दिग्गजांचा भरणा असलेल्या पुणे सुपरजायंट्ससमोर आव्हान आहे.

आॅनलाईन लोकमत

नवी दिल्ली, दि. 12 - दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर आज रात्री आठ वाजता अनुभवहीन दिल्ली डेअरडेविल्सचे दिग्गजांचा भरणा असलेल्या पुणे सुपरजायंट्ससमोर आव्हान आहे. दिल्लीच्या दृष्टीने औपचारिकता असलेल्या या सामन्यात पुण्याचा संघ मात्र विजयासह गुणतक्त्यात आणखी वरचे स्थान गाठण्यास उत्सुक आहे. पुणे सुपरजायंट्सचा संघ गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानावर आहे. १२ सामन्यात ८ विजयांसह पुण्याने १६ गुणांची कमाई केली आहे. मागच्या ८ पैकी सात सामन्यात विजय मिळवणाऱ्या पुणे संघाला रोखणे हे दिल्लीला सोपे नाही. मात्र या स्पर्धेतील उर्वरीत सामने जिंकून निरोप घेण्यासाठी दिल्लीचे फलंदाज प्रयत्नशील आहे. दिल्लीच्या संघाकडे गुणवत्तेची कमी नाही. मात्र दिल्लीचे युवा फलंदाज नेहमीच अनुभवात कमी पडतात. संजू सॅमसन, रिषभ पंत, करुण नायर, श्रेयश अय्यर हे फलंदाज कोणत्याही मोठ्या धावसंख्येला गवसणी घालण्यास सक्षम आहेत. मात्र एक मोठी खेळी केल्यावर पुढच्या दोन सामन्यात अपयशी ठरत असल्याने दिल्लीला प्ले आॅफच्या शर्यतीतून बाहेर व्हावे लागले. ९३ धावांची मोठी खेळी केल्यावर पुढच्या दोन्ही सामन्यात रिषभ पंतला दुहेरी आकडा गाठता आला नाही. गुजरात लायन्स विरोधात तर त्याचे धावबाद होणे हे अनुभवाचीच कमतरता असल्याचे दिसून आले.दिल्लीची गोलंदाजी अनुभवी आहे. जहीर, शमी हे दमदार गोलंदाज आहेत. त्यांच्या सोबतीला अमित मिश्रा, पॅट कमिन्स, कासिगो रबाडा हे देखील संघाच्या गोलंदाजीला मजबुती देतात.पुण्याच्या गोलंदाजीचा विचार करता जयदेव उनाडकटकडे दिल्लीच्या फलंदाजांनी विशेष गांभिर्याने पाहिले पाहिजे. टी २० मधील सर्वात अप्रतिम षटक टाकण्याचा मान जयदेवकडे आहे. त्याने गेल्या सामन्यात सनरायजर्स विरोधात अखेरच्या षटकात हॅट्ट्रिक घेत निर्धाव टाकले होते. त्याच्या जोडीला फिरकीपटू इम्रान ताहीरही आहे. वॉशिंग्टन सुंदर, बेन स्टोक्स यांचा माराहीभेदक आहे. मात्र शार्दुल ठाकूर आणि डॅनियल ख्रिस्तीयन यांना लय मिळवावी लागेल. फलंदाजीचा विचार करता राहुल त्रिपाठी सोबतच अजिंक्य रहाणे याला देखील धावा काढाव्या लागतील. या सत्रात त्याला एकदाच अर्धशतक झळकावता आले आहे.त्याने २०.६६ च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. या सामन्यातील विजयाने पुणे दुसऱ्या स्थानावर पोहचेल. त्याचा फायदा त्यांना क्वालिफायर १ मध्ये पोहचण्यास होईल. कर्णधार स्टिव्ह स्मिथ, महेंद्रसिंह धोनी, बेन स्टोक्स यासोबतच अष्टपैलु मनोज तिवारी यांना देखील धावा काढाव्या लागतील.