शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अपेक्षेपूर्वीच निमंत्रण मिळाले : कमिन्स

By admin | Updated: March 15, 2017 01:16 IST

माझ्या अपेक्षेच्या तुलनेत कसोटी खेळण्याचे निमंत्रण लवकर मिळाले असून माझ्यासाठी हे दुसरे पदार्पण आहे, अशी प्रतिक्रिया आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट

रांची : माझ्या अपेक्षेच्या तुलनेत कसोटी खेळण्याचे निमंत्रण लवकर मिळाले असून माझ्यासाठी हे दुसरे पदार्पण आहे, अशी प्रतिक्रिया आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने व्यक्त केली. भारताविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेत त्याला तिसऱ्या कसोटी सामन्यात संधी मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कमिन्सला पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीनंतर त्याला कसोटी सामना खेळायला मिळण्याची चांगली संधी आहे. त्याला दुखापतग्रस्त मिशेल स्टार्कच्या स्थानी संघात स्थान मिळाले आहे. सोमवारी कमिन्स म्हणाला, ‘एक विचार करता माझ्यासाठी हे दुसऱ्या पदार्पणाप्रमाणे आहे. पाच-सहा वर्षांत बरेच काही घडल्याप्रमाणे भासत आहे. त्यावेळच्या तुलनेत हे दिवस तयारीसाठी चांगले आहेत. (वृत्तसंस्था)शारीरिकदृष्ट्या व फॉर्मचा विचार केला तर आता मी चांगला आहे. गेल्या काही दिवसांपासून मी सातत्याने खेळत आहे.’कमिन्स पुढे म्हणाला, ‘काही बाबींचा विचार केला तर मला पहिल्या लढतीप्रमाणे भासत आहे., पण वन-डे व टी-२० मध्ये आॅस्ट्रेलिया संघाचा सदस्य असल्यामुळे दडपण जाणवत नाही. तेथील माहोल अशाच प्रकारचा असतो.’कमिन्सने २०११ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार पदार्पण केले होते. त्यानंतर तो एकही कसोटी सामना खेळलेला नाही. त्याच्या मते विचार केला त्यातुलनेत बरेच लवकर कसोटी संघात परत बोलविण्यात आले. कमिन्स पुढे म्हणाला, ‘दोन महिन्यांपूर्वी या दौऱ्यासाठी राखीव खेळाडू होतो. गोलंदाजांना अधिक गोलंदाजी करावी लागणार नसल्यामुळे ते दुखापतग्रस्त होतील, असा विचार केला नव्हता. त्यामुळे मी येथे येण्याबाबत विचार करीत नव्हतो.’गुरुवारपासून प्रारंभ होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात राखीव खेळाडू असलेल्या जॅक्सन बर्डऐवजी कमिन्सची निवड झाली तर त्याच्यावर स्टार्कची उणीव भासू न देण्याची कठीण जबाबदारी राहणार आहे. संघासाठी योगदान देण्यास उत्सुक असल्याचे त्याने सांगितले. कमिन्स २३ वर्षांचा असून अ‍ॅशेस मालिकेत इंग्लंडविरुद्ध खेळण्याची संधी मिळेल, अशी त्याला आशा होती. कमिन्स म्हणाला, ‘मी वन-डे संघात स्थान मिळवण्याचे लक्ष्य निर्धारित केले होते. त्यानंतर कसोटी संघात स्थान मिळवण्याच्या दृष्टीने विचार करणार होतो. पण हे सर्वकाही लवकर घडले, असा मी विचार केला नव्हता.’ (वृत्तसंस्था)