शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

प्रो-बॉक्सिंगमध्ये होणार शंभर कोटींची गुंतवणूक

By admin | Updated: November 17, 2016 02:07 IST

देशात प्रो-बॉक्सिंगला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय बॉक्सिंग परिषदेने (आयबीसी) स्पोर्टी सोल्युशन्ससोबत करार केला आहे.

नवी दिल्ली : देशात प्रो-बॉक्सिंगला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय बॉक्सिंग परिषदेने (आयबीसी) स्पोर्टी सोल्युशन्ससोबत करार केला आहे. याअंतर्गत पुढील पाच वर्षांत शंभर कोटींची गुंतवणूक केली जाईल.या कराराचा हेतू देशात प्रो-बॉक्सिंगचा प्रसार आणि प्रचार करणे, तसेच पायाभूत सुविधांची उभारणी हा असेल. याशिवाय पुढील पाच वर्षांत बॉक्सिंगमध्ये भारताला विश्वस्तरावर लौकिक मिळवून देणे हादेखील हेतू असेल. या उपायांमुळे भारतात बॉक्सिंगची बाजारपेठदेखील निर्माण होण्यास मदत होईल. असे झाल्यास बॉक्सर्सकडे लढती खेळणे आणि पैसा कमविणे हा पर्याय उपलब्ध होईल. करारांतर्गत आयबीसी- स्पोर्टी सोल्युशन्स हे पुढील वर्षी जानेवारीत सुरू होत असलेल्या पहिल्या आयबीसी फाईट नाईट कार्ड स्पर्धेवर कोट्यवधींचा खर्च करणार आहेत. (वृत्तसंस्था)यावेळी उपस्थित असलेले आयबीसीचे अध्यक्ष ब्रिगेडियर मुरलीधर राजा म्हणाले,‘या करारामुळे देशात प्रो-बॉक्सिंगला नवी ऊर्जा मिळणार आहे. देशात प्रो- बॉक्सिंगच्या विकासासाठी आम्हाला योग्य पार्टनरची गरज होती. स्पोर्टी सोल्युशन्सला खेळातील व्यापाराचा दीर्घानुभव आहे. या करारामुळे भारत विश्व स्तरावर बॉक्सिंगची मोठी बाजारपेठ म्हणून पुढे येईल, अशी आशा आहे.’स्पोर्टीचे सीईओ आशिष चढ्ढा म्हणाले, ‘व्यावसायिक बॉक्सिंग शानदार खेळ आहे. यात उतरण्याचा आमचा हेतू देशाला जागतिक बाजारपेठेत ओळख मिळवून देणे हाच आहे. याशिवाय राष्ट्रीय स्तरावर पैशाचे स्रोत उत्पन्न करावे लागेल. या करारामुळे प्रो-बॉक्सिंगसाठी सर्व स्तरावर कोचेसचा लवकरच शोध घेतला जाईल.’(वृत्तसंस्था)