शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय पिकलबॉल; भारतीय खेळाडू थायलंडमध्ये चमकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 04:13 IST

थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेत एका सुवर्ण पदकासह एकूण ५ पदकांची कमाई करत अभिमानाने तिरंगा फडकाविला.

मुंबई : भारतीय खेळाडूंनी आपल्या चमकदार खेळाच्या जोरावर नुकत्याच थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेत एका सुवर्ण पदकासह एकूण ५ पदकांची कमाई करत अभिमानाने तिरंगा फडकाविला. कस्तुरी विघ्नेने एक सुवर्ण व २ रौप्य पदक जिंकून आपला विशेष ठसा उमटविला. भारतीय संघात मनीष राव, सुनील जोशी, कादंबरी पाटील, शिवानी सुरतकळ व कस्तुरी यांचा समावेश होता.हुआ हिन शहरात थायलंड पिकलबॉल संघटनेच्या वतीने झालेल्या या स्पर्धेत भारतासह एकूण २० देशांचा सहभाग होता. मिश्र गटात भारतीयांचे वर्चस्व दिसून आले. कस्तुरीने मिश्र दुहेरीत सुनील जोशीसह खेळताना अंतिम फेरीत सुवर्ण पदकावर कब्जा केला. कस्तुरी-सुनील यांनी एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्याच कादंबरी पाटील आणि तिचा इंग्लंडचा साथीदार ख्रिस जेम्स यांचा १५-७ असा पराभव केला.महिला एकेरीत कस्तुरीला अंतिम सामन्यात सिंगापूरच्या विनेशा चॅनविरुद्ध १-१५ असा मोठा पराभव पत्करावा लागला. तसेच, महिला दुहेरीत सिंगापूरच्या खेळाडूसह खेळताना कस्तुरीचा लुईस स्टीफन्स-सु हॅरिस या इंग्लंडच्या जोडीकडून ४-१५ अस्सा पराभव झाला. यामुळे तिला दोन्ही गटांमध्ये रौप्य पदकावर समाधान मानाव लागले.पुरुष दुहेरीत मनीष राव-सुनील या अनुभवी खेळाडूंनी शानदार खेळ केला. अटीतटीच्या सामन्यात त्यांनी कोरी कार्लसन-डेव्हिड बौडेन या अमेरिकन जोडीला १५-९ असे नमवत कांस्य पदकावर नाव कोरले.>मनिष रावचा ‘पंच’स्पर्धेत सहभागी झालेला भारताचा सर्वात अनुभवी खेळाडू मनिष रावने पाचवे आंतरराष्ट्रीय पदक मिळवताना छाप पाडली. याआधी त्याने अमेरिकन स्पर्धेत २, तर बँकॉक आणि जर्मन ओपन स्पर्धेत प्रत्येकी एक पदक जिंकले होते. याशिवाय सुनील जोशीचे हे जर्मन ओपननंतर दुसरे आंतरराष्ट्रीय पदक असून कस्तुरी व कादंबरी यांनी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय पदकाची कमाई केली.