कराची : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) भारत - पाक क्रिकेट मालिकेचे पुनरुज्जीवन झालेले पाहण्यास उत्सुक असली तरी, आयसीसी या दोन्ही देशांच्या क्रिकेट संघटनांमध्ये हस्तक्षेप करण्यास असमर्थ असल्याचे आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव रिचर्डसन यांनी सांगितले.याविषयी अधिक बोलताना रिचर्डसन म्हणाले की, भारत - पाकिस्तान यांच्यातील खेळ जागतिक क्रिकेटसाठी किती महत्त्वाचे आहे याची कल्पना आम्हाला आहे. मात्र दुर्देवाने आयसीसी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करु शकत नाही. कारण हा पुर्णपणे या दोन देशांच्या क्रिकेट संघटनेचा प्रश्न आहे. भारत - पाक सामन्यासाठी प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा असतो जो क्रिकेट खेळासाठी खुप शानदार असल्याचे देखील रिचर्डसन म्हणाले. आयसीसीच्या भूमिकेविषयी म्हणताना रिचर्डसन म्हणाले की, आयसीसीच्या विविध मालिकांमध्ये भारत - पाक सामन्यातील ‘टशन’ अनेकदा अनुभवली आहे. मात्र नव्या नियमांनुसार आता द्विपक्षीय दौऱ्यांसंबधी संबधित क्रिकेट संघटना स्वत: निर्णय घेतात आणि यामध्ये आयसीसी केवळ सामनाधिकारींच्या नियुक्ती विषयी जबाबदारी घेते.
भारत-पाक मालिका; आयसीसीचा हस्तक्षेप नाही : रिचर्डसन
By admin | Updated: June 6, 2015 01:13 IST