शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
5
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
6
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
7
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
8
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
9
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
10
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
11
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
12
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
13
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
14
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
15
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
16
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
17
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
18
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
19
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
20
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका

फायनलसारखी असेल भारत-पाक लढत : इंझमाम

By admin | Updated: February 3, 2015 01:22 IST

भारताला विश्वकप स्पर्धेत जेतेपद राखण्याची ६० ते ७० टक्के संधी असून भारत व पाकिस्तान यांच्यादरम्यानची लढत फायनलसारखी असेल,

नवी दिल्ली : भारताला विश्वकप स्पर्धेत जेतेपद राखण्याची ६० ते ७० टक्के संधी असून भारत व पाकिस्तान यांच्यादरम्यानची लढत फायनलसारखी असेल, असे मत पाकिस्तानच्या विश्वकप विजेता संघाचा सदस्य व माजी कर्णधार इंझमाम उल-हक याने व्यक्त केले. एका वृत्तवाहिनीतर्फे विश्वकप क्रिकेटवर सोमवारी आयोजित चर्चासत्रात इंझमाम, भारताचे माजी कर्णधार कपिल देव, माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर, दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्षेत्ररक्षक व भारताचा माजी सलामीवीर अरुण लाल यांनी आपले विचार मांडले. इंझमामच्या मते भारताला जेतेपद राखण्याची ६० ते ७० टक्के संधी आहे तर अरुणलाल व शोएब यांच्या मते भारत अव्वल चार संघात स्थान मिळविण्यात यशस्वी ठरेल. कपिल देव यांनी सहयजमान न्यूझीलंड छुपारुस्तम असल्याचे सांगताना पहिली १५ षटके भारतासाठी निर्णायक ठरतील, असे मत व्यक्त केले. इंझमाम पुढे म्हणाला,‘आॅस्ट्रेलिया दौऱ्यात भारताला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नसली तरी भारतीय संघ येथे बरेच दिवसांपासून आहे. त्यांना येथील वातावरणाचा सराव झाला असून त्याचा त्यांना लाभ मिळेल. पराभूत संघामध्ये पुनरागमन करण्यासाठी नवा उत्साह संचारतो, असा अनुभव आहे. भारतीय फलंदाजांमध्ये संघाला पुन्हा एकदा विश्वविजेतेपद पटकावून देण्याची क्षमता आहे. भारताकडे रोहित, विराट व रैना यांच्यासारखे सामना जिंकून देणारे फलंदाज आहे. (वृत्तसंस्था)धोनीचे नेतृत्व भारताच्या यशाची किल्ली : इंझमाम व शोएबविश्वकप क्रिकेट स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीसारखा कर्णधार भारतीय संघाच्या यशाची कुंजी ठरेल, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल-हक व शोएब अख्तर यांनी व्यक्त केले. पाच विश्वकप स्पर्धेत पाक संघाचे प्रतिनिधित्व करणारा इंजमाम म्हणााल,‘धोनीकडे संघाचे नेतृत्व असणे महत्त्वाचे आहे. प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अनुभवी कर्णधार असणे आवश्यक ठरते. धोनीने दडपणाच्या स्थितीत भारतातर्फे चांगली कामगिरी केली आहे. दडपणाखाली चांगली कामगिरी करण्याची क्षमता असलेला कर्णधार भारतीय संघाकडे आहे. शोएब म्हणाला,‘संघ दडपणाखाली असताना धोनी पुढे सरसावत संघाचे नेतृत्व करतो. त्याच्यावर कसेलच दडपण जाणवत नाही.’