शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

भारताचा दणदणीत विजय

By admin | Updated: June 27, 2017 00:54 IST

पावसाने केलेल्या खेळीनंतर अजिंक्य रहाणेने (१०३) झळकावलेले दमदार शतक आणि यानंतर गोलंदाजांनी केलेला अचूक मारा

त्रिनिदाद : पावसाने केलेल्या खेळीनंतर अजिंक्य रहाणेने (१०३) झळकावलेले दमदार शतक आणि यानंतर गोलंदाजांनी केलेला अचूक मारा या जोरावर भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान वेस्ट इंडीजचा १०५ धावांनी पराभव केला. यासह ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही पावसाचा व्यत्यय आला. पावसामुळे तब्बल २ तास उशिराने सुरू झालेला हा सामना प्रत्येकी ४३ षटकांचा खेळविण्याचा निर्णय पंचांनी घेतला. नाणेफेक जिंकून यजमानांनी टीम इंडियाला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केल्यानंतर रहाणे, कर्णधार विराट कोहली (८७) आणि शिखर धवन (६३) यांच्या जोरावर भारताने निर्धारित ४३ षटकांत ५ बाद ३१० धावांचा हिमालय उभारला. हे भलेमोठे आव्हान यजमानांना अजिबात पेलवले नाही. भारतीयांच्या अचूक माऱ्यापुढे त्यांचा डाव निर्धारित षटकात ६ बाद २०५ धावांवर थांबला. सलामीवीर शाइ होप याचा अपवाद वगळता विंडीजचा एकही फलंदाज फारशी चमक दाखवू शकला नाही. विंडीजची सुरुवातच खराब झाली. भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर किरोन पॉवेल याला शून्यावर बाद केले. यानंतर आपल्या पुढच्याच षटकात जेसन मोहम्मदला भोपळा न फोडू देता तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर होप - एविन लुईस (२१) यांनी ८९ धावांची भागीदारी करून संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुलदीप यादवने लुईसला यष्टिचीत करून विंडीजला पहिला धक्का दिला. (वृत्तसंस्था)यानंतर अर्धशतक झळकावलेला होपही कुलदीपचीच शिकार ठरला. रविचंद्रन आश्विनने जोनाथन कार्टरला (१३) बाद केल्यानंतर पुन्हा एकदा कुलदीपने विंडीजला धक्का देताना कर्णधार होल्डरला (२९) बाद केले. यावेळी आवश्यक धावगती १५च्याही वर गेल्याने यजमानांनी पुनरागमनाचे प्रयत्न सोडले. कुलदीपने ५० धावांत ३ महत्त्वपूर्ण बळी घेत विंडीजचे कंबरडे मोडले.तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर पुन्हा एकदा रहाणे- धवन यांनी शतकी भागीदारी करून भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. धवन ५९ चेंडंूत १० चौकारांसह ६३ धावा काढून परतला. यानंतर रहाणे-कोहली यांनी डाव सावरताना विंडीजची धुलाई केली. (वृत्तसंस्था)भारत : ४३ षटकांत ५ बाद ३१० धावा.वेस्ट इंडीज : किएरन पॉवेल झे. धोनी गो. भुवनेश्वर ०, शाइ होप पायचीत गो. कुलदीप ८१, जेसन मोहम्मद झे. पांड्या गो. भुवनेश्वर ०, एविन लुईस यष्टिचीत धोनी गो. कुलदीप २१, जोनाथन कार्टर पायचीत गो. आश्विन १३, जेसन होल्डर यष्टिचीत धोनी गो. कुलदीप २९, रोस्टन चेस नाबाद ३३, अ‍ॅश्ले नर्स नाबाद १९. अवांतर - ९. एकूण : ४३ षटकांत ६ बाद २०५ धावा. गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ५-१-९-२; उमेश यादव ६-०-३६-०; हार्दिक पांड्या ९-०-३२-०; रविचंद्रन आश्विन ९-०-४७-१; कुलदीप यादव ९-०-५०-३; युवराज सिंग ५-०-२५-०.