नाणेफेक जिंकूनही नेहमीप्रमाणे फलंदाजी न घेता धावांचा पाठलाग करण्याची ‘टेस्ट’ देण्यासाठी मैदानात उतरलेल्या धोनीच्या यंग इंडियाला दुबळ्या झिम्बाब्वेने चांगलीच टस्सल दिली. सुरुवातीचे चार फलंदाज स्वस्तात तंबूत परतल्यानंतर धोनी-रैनाच्या जोडीने सुरुवातीला चिवट अन् नंतर आक्रमक खेळी करीत भारताच्या विजयाचा षटकार खेचला. 10 सामने वर्ल्डकपमध्ये सलग जिंकण्याचा भारताचा विक्रम.जिगरबाज रैनारैनाने महत्त्वाच्या वेळी जिगरबाज शतक तडकावले. पहिले अर्धशतक ६७ चेंडूंत तर दुसरे केवळ २७ चेंडूंतच पूर्ण केले. कूल धोनीचे ‘सुपर सिक्स’1या वर्ल्डकपमधील सलग सहावा विजय 2सलग सहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला आॅल आऊट केले 3षटकार मारून केला विजय साजरा4सहा विकेट्सने झिम्बाब्वेचा पराभव5सहाव्या क्रमांकावर धोनीची यशस्वी खेळी6रैनासोबत केलेली भागीदारी भारताची सर्वोत्तम सहावी भागीदारी