शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा विजय हुकला

By admin | Updated: August 5, 2016 04:03 IST

चेस (१३७*) याने झळकावलेल्या शानदार शतकाच्या जोरावर वेस्ट इंडीजने पराभवाच्या रस्त्यावरून मार्ग काढताना भारताविरुद्धची दुसरी कसोटी अनिर्णित राखली.

किंगस्टन : आपल्या कारकिर्दीतील केवळ दुसराच कसोटी सामना खेळत असलेला युवा अष्टपैलू रोस्ट चेस (१३७*) याने झळकावलेल्या शानदार शतकाच्या जोरावर वेस्ट इंडीजने पराभवाच्या रस्त्यावरून मार्ग काढताना भारताविरुद्धची दुसरी कसोटी अनिर्णित राखली. शेन डार्विचने (७४) देखील जबरदस्त अर्धशतक झळकावून चेसला चांगली साथ दिली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी केलेल्या १४४ धावांच्या निर्णायक भागीदारीच्या जोरावर यजमानांनी भारतीयांना सलग दुसऱ्या विजयापासून दूर ठेवले. विंडीजने दुसऱ्या डावात ६ बाद ३८८ धावा केल्या.सबिना पार्क मैदानावर झालेल्या या सामन्यात पहिल्या डावात ३०४ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर विंडीजची दुसऱ्या डावाची सुरुवातही अडखळती झाली. चौथ्या दिवशी यजमानांनी ४८ धावांवर ४ खंदे फलंदाज गमावले होते. नेमकी याच वेळी अष्टपैलू चेसने विक्रमी खेळी करताना संघाला केवळ सावरलेच नाही, तर पराभवापासूनही दूर नेले. गोलंदाजीत ५ बळी घेतल्यानंतर फलंदाजीमध्ये शानदार शतक झळकावताना चेसने सामनावीरच्या पुरस्कारावर कब्जा केला. त्याने १६९ चेंडूंमध्ये १५ चौकार आणि एका षटकारासह नाबाद १३७ धावांचा तडाखा दिला. विशेष म्हणजे चेसचे हे कसोटीतील पहिले शतक ठरले. दखल घेण्याची बाब म्हणजे, दुसऱ्यांदा विंडीज खेळाडूने एकाच सामन्यात ५ बळी व शतक अशी विक्रमी अष्टपैलू खेळी केली आहे. चेसच्याआधी असा पराक्रम महान अष्टपैलू गॅरी सोबर्स यांनी इंग्लंडविरुद्ध लॉडर््स मैदानावर केला होता. चेसने जेरेमी ब्लॅकवूडसह (६३) पाचव्या विकेटसाठी ९३ धावांची, तर शेन डार्विचसह सहाव्या विकेटसाठी १४४ धावांची जबरदस्त भागीदारी केली. भारत पुनरागमन करणार असे दिसत असताना विंडीज कर्णधार जेसन होल्डरने जम बसलेल्या चेसला योग्य साथ देताना नाबाद ६४ धावांची अर्धशतकी खेळी केली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी नाबाद १०३ धावांची भागीदारी करून बरोबरी मान्य करण्यास भारतीयांना भाग पाडले. अंतिम दिवशी भारताला केवळ दोन बळी घेण्यात यश आले. (वृत्तसंस्था)>संक्षिप्त धावफलक वेस्ट इंडीज (पहिला डाव) : सर्व बाद १९६. भारत (पहिला डाव) : ९ बाद ५००. वेस्ट इंडीज (दुसरा डाव) : १०४ षटकांत ६ बाद ३८८ (ब्रेथवेट २३, ब्रावो २०, ब्लॅकवूड ६३, रोस्ट चेस नाबाद १३७, शेन डॉर्विच ७४, जेसन होल्डर नाबाद ६४, मोहम्मद शमी २/८२, मिश्रा २/९०, ईशांत १/५६, आश्विन १/११४.