शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
2
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
3
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
4
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
5
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
6
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
7
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
8
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
9
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
10
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
11
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
12
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
13
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
14
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
15
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
16
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
17
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
18
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
19
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
20
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)

भारताच्या विजयाची भिस्त फलंदाजांवरच!

By admin | Updated: January 29, 2017 04:48 IST

कानपूरमधील पराभवामुळे भारतीय संघाचे डोळे उघडतील, अशी आशा आहे. पहिल्या टी-२०मध्ये भारतीय फलंदाजांनी सुरुवात तर चांगली केली; पण मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात त्यांना

- सुनील गावसकर लिहितो...

कानपूरमधील पराभवामुळे भारतीय संघाचे डोळे उघडतील, अशी आशा आहे. पहिल्या टी-२०मध्ये भारतीय फलंदाजांनी सुरुवात तर चांगली केली; पण मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात त्यांना अपयश आले. गोलंदाजांकडेही धावांचा बचाव करण्याची संधी कमीच होती.मागच्या वेळी भारताने व्हीसीएवर न्यूझीलंडला सामना गमावला तेव्हा मिशेल सँटनर भारतीय फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरला होता. या वेळी खेळपट्टी अधिक चांगली असावी; पण ईडन गार्डन्स कोलकाता तसेच कानपूरच्या ग्रीन पार्कच्या तुलनेत येथे चेंडू अधिकच वळण घेईल, अशीही शक्यता आहे. अशा वेळी पाहुणा संघ आदिल राशीदला संधी देऊ शकतो. भारतीय संघाकडून आॅफ स्पिनर परवेझ रसूलच्या तुलनेत यजुवेंद्र चहल अधिक प्रभावी ठरू शकतो. तो अधिक वेगवान चेंडू टाकत असल्याने तितक्याच लवकर चेंडू वळण घेईल, अशी शक्यता आहे.भारताच्या विजयाची भिस्त फलंदाजांच्या कामगिरीवर असेल. फॉर्ममध्ये नसलेल्या केएल राहुलला नागपुरात मोठी खेळी करून चमक दाखविण्याची संधी असेल. युवराजला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही; पण आपल्या लौकिकानुसार फटकेबाजी करून षटकारांची आतषबाजी करावी इतकी माफक अपेक्षा चाहत्यांना त्याच्याकडून असेल. असे घडल्यास आतापर्यंतचे अपयश पुसून निघेल.कानपूरमधील इंग्लंडचा विजय भारताच्या काळजीत भर पाडणारा ठरला. भारतीय फलंदाजांना कुठलीही संधी न देता प्रतिस्पर्धी गोलंदाजांनी जो आक्रमक मारा केला, तो वाखाणण्यासारखा होता. भारतीयांना फटका मारण्याची संधी न देता इंग्लंडने सर्वच फलंदाजांना अलगद जाळ्यात अडकविले. इंग्लंडने कसोटी आणि वन डे मालिका गमावल्यानंतरही अखेरचा वन डे जिंकून आत्मविश्वास मिळविला होता. कानपूरचा सामना जिंकल्याने उत्साहात आणखीच भर पडली. आता इंग्लंड संघ टी-२० मालिका विजयाच्या जवळ पोहोचला आहे. मालिका जिंकल्यास पाहुणा आनंदी होऊन मायदेशी परत जाईल. दुसरीकडे इंग्लंडच्या आशेवर पाणी पाडायचे असेल तर भारतीय खेळाडूंना स्वत:च्या खेळाचा दर्जा उंचवावा लागेल.(पीएमजी)