शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

भारताचे ‘लक्ष्य’ आॅलिम्पिक कोटा

By admin | Updated: August 5, 2015 23:32 IST

अजरबेजान (गाबेला) येथे आजपासून सुरु होणाऱ्या आयएसएसएफ विश्व अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत भारतीय खेळाडुंचे मुख्य लक्ष्य असेल ते

नवी दिल्ली : अजरबेजान (गाबेला) येथे आजपासून सुरु होणाऱ्या आयएसएसएफ विश्व अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत भारतीय खेळाडुंचे मुख्य लक्ष्य असेल ते आॅलिम्पिक पात्रतेचे. या स्पर्धेतून चमकदार कामगिरीच्या जोरावर आॅलिम्पिक कोटाद्वारे थेट प्रवेश मिळवण्यासाठी भारताचे रायफल, पिस्तुल आणि शॉटगन नेमबाज प्रयत्नशील असतील. विशेष म्हणजे भारताच्या आतापर्यंत ५ खेळाडूंनी ओलिम्पिक कोटाद्वारे पात्रता मिळवली असून गाबेला येथे रंगणाऱ्या स्पर्धेद्वारे ३४ खेळाडूंचा आॅलिम्पिक प्रवेश निश्चित होईल. त्यामुळे या स्पर्धेत मोठी चुरस दिसून येईल.या स्पर्धेत अभिनव बिंद्रा, गगन नारंग आणि जीतू रॉय या अव्वल नेमबाजांवर भारताची मदार असून या तिघांव्यतिरीक्त अपूर्वी चंदेला आणि गुरप्रीत सिंग यांनी रिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. दरम्यान यावेळी हिना सिंग, मानवजीत सिंग संधू, विजय कुमार, आयोनिका पाल, चैन सिंग, अंकुर मित्तल आणि मोहम्मद आसाब या नेमबाजांना देखील आॅलिम्पिक कोटआंतर्गत प्रवेश मिळवण्याची नामी संधी आहे.