शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशविरुद्ध लढतीसाठी भारतीय संघ जाहीर

By admin | Updated: February 1, 2017 04:59 IST

तमिळनाडूचा सलामीवीर अभिनव मुकुंदला जवळजवळ सहा वर्षांनंतर भारतीय कसोटी संघात पाचारण करण्यात आले. बांगलादेशविरुद्ध ९ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत हैदराबादमध्ये

नवी दिल्ली : तमिळनाडूचा सलामीवीर अभिनव मुकुंदला जवळजवळ सहा वर्षांनंतर भारतीय कसोटी संघात पाचारण करण्यात आले. बांगलादेशविरुद्ध ९ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत हैदराबादमध्ये रंगणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी मंगळवारी भारताचा १६ सदस्यांचा संघ जाहीर करण्यात आला. मुकुंदला राखीव सलामीवीर म्हणून संधी मिळाली आहे.संघनिवडीचा विचार करता तमिळनाडूचा सलामीवीर अभिनव मुकुंदला संघात पाचारण करण्यात आले असून वृद्धिमान साहाने पार्थिव पटेलचे स्थान घेतले.मुकुंदने रणजी ट्रॉफी स्पर्धेत ७०० पेक्षा अधिक धावा फटकावित निवड समितीचे लक्ष वेधले. २०११ मध्ये इंग्लंड व वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर मुकुंदला आता संधी मिळाली. मुकुंदचा अपवाद वगळता संघात विशेष बदल नाही. दुखापतीतून सावरलेले अजिंक्य रहाणे, जयंत यादव, हार्दिक पांड्या यांना संघात स्थान मिळाले आहे. मुरली विजय, के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, करुण नायर, आर. आश्विन, रवींद्र जडेजा अपेक्षेप्रमाणे संघात आहेत. ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार व उमेश यादव वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळणार आहेत. अतिरिक्त फिरकीपटू म्हणून मिश्राची निवड करण्यात आली आहे.(वृत्तसंस्था)बैठकीला ६ तास विलंबनिवड समितीची बैठक जवळजवळ सहा तास उशिराने सुरू झाली. बीसीसीआयच्या नव्या प्रशासकांनी (सीओए) सहसचिव अमिताभ चौधरी यांना बैठकीचे संचालन करण्यापासून रोखले. अनेक फोन कॉल्स व ई-मेल्सची आदानप्रदान झाल्यानंतर बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांनी बैठकीचे संचालन केले.भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, करुण नायर, वृद्धिमान साहा, आर. आश्विन, रवींद्र जडेजा, जयंत यादव, उमेश यादव, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा, अभिनव मुकुंद, हार्दिक पांड्या.