शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

पुजारा, रहाणेच्या अर्धशतकानंतर भारताची घसरण

By admin | Updated: September 30, 2016 20:01 IST

चेतेश्वर पुजारा (८७) आणि अजिंक्य रहाणे (७७) यांचे शानदार अर्धशतक आणि त्यांनी चौथ्या गड्यासाठी केलेल्या १४१ धावांच्या सुरेख भागीदारीनंतरही भारतीय संघ दुसऱ्या

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 30  : चेतेश्वर पुजारा (८७) आणि अजिंक्य रहाणे (७७) यांचे शानदार अर्धशतक आणि त्यांनी चौथ्या गड्यासाठी केलेल्या १४१ धावांच्या सुरेख भागीदारीनंतरही भारतीय संघ दुसऱ्या क्रिकेट कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या दिवशी शुक्रवारी ढेपाळला आणि त्यांनी ईडन गार्डनमध्ये ७ फलंदाज २३९ धावांत गमावले.

भारताने आपल्या घरच्या २५0 व्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला; परंतु भारताची सुरुवात खराब झाली आणि ४६ धावांतच त्यांनी ३ फलंदाज गमावले. त्यानंतर पुजारा आणि रहाणे यांनी १४१ धावांची भागीदारी केली; परंतु ही भागीदारी तुटल्यानंतर भारतीय डाव ढेपाळला आणि दिवसअखेर त्यांनी त्यांचे ७ फलंदाज गमावले.पुजाराने २१९ चेंडूंत ८७ धावांत १७ चौकार मारले. रहाणेने १५७ चेंडूंचा सामना करताना ११ चौकारांसह ७७ धावांची खेळी सजवली. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी ४७.३ षटकांत १४१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. भारताची धावसंख्या १८७ असताना पुजारा बाद झाला त्यानंतर २00 धावसंख्या असताना रहाणेदेखील परतला. आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विनने ३३ चेंडूंत ४ चौकारांसह २६ धावा केल्या.जखमी लोकेश राहुलच्या जागी या सामन्यात समाविष्ट करण्यात आलेला शिखर धवन आपल्या खराब फार्ममधून सावरू शकला नाही आणि अवघी १ धाव काढून तो बाद झाला. पहिल्या कसोटीत दोन्ही डावांत अर्धशतक झळकावणारा मुरली विजय आज ९ धावांवर तंबूत परतला. कर्णधार विराट कोहली सलग तिसऱ्या डावात फ्लॉप ठरला व त्याला अवघ्या ९ धावाच करता आल्या. रोहित शर्मा २ धावांवर बाद झाला. दिवसअखेर रिद्धिमान साहा १४ आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा 0 धावांवर खेळत होते.कानपूरमध्ये पहिली कसोटी १९७ अशा मोठ्या अंतराने जिंकल्यानंतर घरच्या मैदानावर आपला २५0 वा कसोटी सामना खेळण्यास ईडन गार्डनवर उतरणाऱ्या भारताची सुरुवात सनसनाटी झाली. गौतम गंभीरऐवजी पसंती देण्यात आलेल्या शिखर धवनने निराशा केली. शिखर धवन दुसऱ्याच षटकातील चौथ्या चेंडूंवर मॅट हेन्रीचा बळी ठरला. तो हेन्रीचा चेंडूवर त्रिफळाबाद झाला.विजय आणि पुजाराने दुसऱ्या गड्यासाठी २७ धावांची भागीदारी केली; परंतु विजय हेन्रीच्या सुरेख चेंडूंवर यष्टिरक्षक जे वॉटलिंगकरवी झेलबाद झाला. तो बाद झाला तेव्हा भारताची स्थिती २ बाद २८ अशी होती.कर्णधार विराट कोहली मालिकेत सलग तिसऱ्यांदा स्वस्तात बाद झाला. ट्रेंट बोल्टच्या उजव्या यष्टीबाहेर जाणाऱ्या चेंडूवर ड्राइव्ह करण्याच्या प्रयत्नात विराट गलीमध्ये टॉम लॅथमकरवी झेलबाद झाला. विराटने २८ चेंडूंत एका चौकारांसह ९ धावा केल्या. कानपूरमध्ये तो दोन्ही डावांत ९ व १८ धावांवर बाद झाला होता.त्यानंतर पुजारा आणि रहाणेने भारताला उपाहारापर्यंत ५७ धावसंख्येपर्यंत पोहोचवले. या दोघांनी उपाहारानंतर सुरेख भागीदारी करीत भारतीय डाव बळकट केला. पुजाराने १४६ चेंडूंत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. उपाहारापर्यंत भारताची स्थिती ५८ षटकांत ३ बाद १३६ अशी होती.चहापानानंतर रहाणे याने त्याचे अर्धशतक १00 धावांत पूर्ण केले. दोन्ही फलंदाजांनी १00 धावांची भागीदारी २३२ चेंडूंत पूर्ण केली. मालिकेतील सलग तिसरे अर्धशतक झळकावणारा पुजाराने शतकाकडे वाटचाल सुरू केली होती; परंतु डावखुरा वेगवान गोलंदाज नील वॅगनरने पुजाराच्या सुरेख डावाला पूर्णविराम दिला. धीरोदात्त खेळी करणारा पुजारा लॉफ्टेड ड्राइव्ह खेळण्याच्या प्रयत्नात कव्हरमध्ये मार्टिन गुप्तिलच्या हाती झेल देऊन परतला. पुजाराने कानपूरमध्ये ६२ आणि ७८ धावा केल्या होत्या व या कसोटीत त्याने ८७ धावा केल्या.त्यानंतर आलेला रोहित शर्मा जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही आणि आॅफस्पिनर जितन पटेलच्या चेंडूवर तो लॉथमला झेल देऊन बाद झाला. लॅथमने सूर मारत हा झेल टिपला. भारताचा पाचवा फलंदाज १९३ धावसंख्या असताना बाद झाला. सलग दोन फलंदाज बाद झाल्यानंतर रहाणे दबावात आला आणि पटेलच्या चेंडूंवर पायचीत झाला. भारताने १३ धावांतच ३ फलंदाज गमावल्याने भारताची स्थिती ६ बाद २00 अशी झाली.आश्विनने मिशेल सेंटनेरला एकाच षटकांत ३ चौकार मारले आणि ३३ चेंडूंत २६ धावा केल्या. आश्विनचा जम बसत आहे असे वाटत असतानाच तो हेन्रीच्या चेंडूवर पायचीत झाला. दिवसाचा खेळ ८६ षटकांनंतर संपवण्यात आला. हेन्रीने ३५ धावांत ३, पटेलने ६६ धावांत २ आणि बोल्टने ३३ धावांत १ गडी बाद केला. वॅगनरने ३३ धावांत १ बळी घेतला.धावफलकभारत (पहिला डाव) : शिखर धवन त्रि. गो. हेन्री १, मुरली विजय झे. वॉटलिंग गो. हेन्री ९, चेतेश्वर पुजारा झे. गुप्तील गो. वॅगनर ८७, विराट कोहली झे. लॅथम गो. बोल्ट ९, अजिंक्य रहाणे पायचीत गो. पटेल ७७, रोहित शर्मा झे. लॅथम गो. पटेल २, आश्विन पायचीत गो. हेन्री २६, रिद्धिमान साहा खेळत आहे १४, रवींद्र जडेजा खेळत आहे 0, अवांतर : १४, एकूण : ८६ षटकांत ७ बाद २३९ धावा. गडी बाद क्रम : १-१, २-२८, ३-४६, ४-१८७, ५-१९३, ६-२00, ७-२३१. गोलंदाजी : बोल्ट १६-८-३३-१, हेन्री १५-६-३५-३, वॅगनर १५-३-३७-१, सेंटनर १९-५-५४-0, पटेल २१-३-६६-२.