शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानावर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
2
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
3
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
6
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
7
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
8
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
9
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
10
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
11
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
12
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
13
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
14
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
15
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
16
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
17
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
18
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
19
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
20
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द

भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश

By admin | Updated: October 19, 2016 04:32 IST

बलाढ्य व संभाव्य विजेत्या भारताने विश्वचषक कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश करताना इंग्लंडला ६९-१८ असे लोळवले.

अहमदाबाद : बलाढ्य व संभाव्य विजेत्या भारताने विश्वचषक कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश करताना इंग्लंडला ६९-१८ असे लोळवले. यासह ‘अ’ गटातून यजमान भारत आणि कोरियाने स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.अत्यंत एकतर्फी झालेल्या या लढतीत भारताने अपेक्षित विजय मिळवताना इंग्लंडला सहजपणे नमवले. उपांत्य फेरी निश्चित करण्यासाठी भारतीयांना विशेष मेहनत घ्यावी लागली नाही. इंग्लंडचा दुबळा बचाव आणि कमजोर आक्रमण याचा चांगलाच समाचार घेताना भारतीयांनी इंग्लंडला कबड्डीचे धडेच दिले.स्टार खेळाडू प्रदीप नरवाल (१३) आणि अजय ठाकूर (११) यांनी तुफानी खेळ करताना इंग्लंडचा पराभव स्पष्ट केला. मध्यंतरालाच ४५-६ अशी जबरदस्त आघाडी घेत भारतीयांनी सामन्याचा निकाल स्पष्ट केला. सुरजीत, सुरेंदर नाडा यांनी भक्कम पकडी करताना इंग्लंडच्या आक्रमणाला रोखले. तसेच संदीप नरवालचा अष्टपैलू खेळ, राहुल चौधरी व नितीन तोमरचे आक्रमणदेखील निर्णायक ठरले.इंग्लंडवर तब्बल ५ लोण चढवताना भारताने सामन्यावर एकहाती नियंत्रण राखले. इंग्लंडकडून कर्णधार सोमेश्वर कालिया (७), केशव गुप्ता (५) आणि टोपे अडेवलुरे (४) यांनी अपयशी झुंज दिली. (वृत्तसंस्था)>केनियाच्या आशा कायम...केनियाने उपांत्य फेरी गाठण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवताना दुबळ्या अमेरिकेचा ७४-१९ असा धुव्वा उडवला. या दणदणीत विजयासह केनियाने ‘ब’ गटात १६ गुण मिळवले आहे. उपांत्य फेरीसाठी केनियाला, थायलंडविरुद्ध जपान विजयी होणे आवश्यक आहे. मात्र, १५ गुणांसह तिसऱ्या स्थानी असलेले थायलंड विजयी झाल्यास केनिया व जपानचे आव्हान संपुष्टात येईल. कर्णधार डेव्हीड मोसाम्बायी आणि फिलिक्स ओपाना यांनी अनुक्रमे १२ व ११ गुणांची लयलूट करताना अमेरिकेच्या आव्हानातली हवा काढली. जेम्स ओबिलो आणि ओधिआम्बो ओगाक यांनी मजबूत पकडी केल्या. मध्यंतरालाच केनियाने ३८-८ असे वर्चस्व राखत अमेरिकेचे मानसिक खच्चीकरण केले.