शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भारताची कामगिरी उंचावेल!

By admin | Updated: August 19, 2015 23:18 IST

पहिल्या सामन्यात झालेल्या नाट्यमय पराभवानंतर भारतीय संघ चुकांपासून धडा घेऊन उद्या, गुरुवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत कामगिरी उंचावण्यासाठी मैदानात पाऊल ठेवेल

कोलंबो : पहिल्या सामन्यात झालेल्या नाट्यमय पराभवानंतर भारतीय संघ चुकांपासून धडा घेऊन उद्या, गुरुवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत कामगिरी उंचावण्यासाठी मैदानात पाऊल ठेवेल, तर दुसरीकडे श्रीलंका त्यांचा महान फलंदाज कुमार संगकाराला विजयाने निरोप देण्याचा प्रयत्न करील.भारत गॅले येथील पहिल्या कसोटीत वर्चस्व निर्माण केल्यानंतरही ६३ धावांनी पराभूत झाला. आक्रमकतेच्या दृष्टिकोनानंतरही भारतीय खेळाडू आवश्यकतेनुसार फलंदाजी आणि गोलंदाजी करण्यात अपयशी ठरले.मधल्या फळीतील फलंदाज दिनेश चांदीमलच्या आक्रमक शतकानंतर भारतीय संघाजवळ पर्यायी व्यूहरचनेचा अभाव होता. भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजांचा सामना करण्यात अपयशी ठरले. इंग्लंडमध्ये मोईन अली आणि आॅस्ट्रेलियाच्या नाथन लियोनदेखील त्यांच्यासाठी अडचणीचे ठरले होते. या दोन दौऱ्यांतील ९ कसोटींत भारतीय फलंदाजांनी दोन फिरकी गोलंदाजांसमोर ४२ विकेट गमावल्या. गॅले कसोटीत १५ बळी हे फिरकी गोलंदाजांनी घेतले. त्यामुळे १० सामन्यांमध्ये भारताचे (बांगलादेशविरुद्ध अनिर्णीत कसोटी सोडून) ५७ फलंदाज फिरकी गोलंदाजीसमोर बाद झाले.पी. साराच्या खेळपट्टीवर उसळी अधिक आहे; परंतु ती फिरकी गोलंदाजीसाठी पोषक असणार आहे. उद्या भारतीय संघाचा फोकस हा निवडीवर असणार आहे. काल सलामीवीर मुरली विजयने नेटवर सहजपणे फलंदाजी केली. त्याने सरावादरम्यान फुटबॉलही खेळला. त्यामुळे तो निवडीसाठी उपलब्ध असणार आहे. तो जखमी शिखर धवनची जागा घेणार आहे. शिखर धवन जखमी असल्यामुळे पूर्ण मालिकेत खेळू शकणार नाही.पहिल्या कसोटीतील दोन्ही डावांत अपयशी ठरल्यानंतरही रोहित शर्मा संघात खेळणे निश्चित मानले जात आहे आणि तो पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर उतरेल. चेतेश्वर पुजाराही सरावात व्यस्त होता. आता फोकस हा अंतिम अकरा जणांची निवड करण्यावर असणार आहे. कर्णधार विराट कोहली आणि संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी पाच गोलंदाजांसह उतरण्याविषयीचा पुनरुच्चार केला आहे; परंतु गॅलेत पाचव्या गोलंदाजाची जबाबदारी ही अव्वल चार गोलंदाजांना रोटेट करण्यासाठी असणार आहे. हरभजनसिंगसारख्या अनुभवी खेळाडूला ही भूमिका पार पाडता आली नाही. त्यामुळे भारताची फलंदाजी कमजोर झाली.दुसऱ्या कसोटीच्या उंबरठ्यावर बोलावण्यात आलेला स्टुअर्ट बिन्नीदेखील दुसऱ्या कसोटीत खेळू शकतो. भारतालाही अष्टपैलू खेळाडूची नितांत आवश्यकता आहे; परंतु तो अपेक्षेला खरा उतरतो का, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. कोहलीने आतापर्यंत चार कसोटी सामन्यांत संघाचे नेतृत्व केले आहे; परंतु त्याला अद्यापही विजयाची चव चाखता आलेली नाही. अ‍ॅडेलमध्ये तो दोनदा पराभूत झाला आणि गॅले येथे विजयानजीक पोहोचूनही त्याला पराभवाचे तोंड पाहावे लागले. गेल्या वेळी २०१० मध्ये भारताने येथे श्रीलंकेला पाच गडी राखून पराभूत केले होते. या कसोटीत वीरेंद्र सेहवाग आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी शतक ठोकले होते. त्या वेळेस संघात ईशांत शर्मा, मुरली विजय आणि अमित मिश्रादेखील होते. मिश्राने गॅले येथील कसोटीत ६ षटकांत २० धावा देऊन दोन आणि ६१ धावांत ३ गडी बाद केले.भारत व श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये आत्तापर्यंत ३६ कसोटी सामने झाले आहेत. यामध्ये भारताने १४ लढतींमध्ये विजय नोंदविला असून ७ सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्कारावा लागला आहे. १५ सामने अनिर्णित राहिले आहेत.प्रतिस्पर्धी संघ : भारत : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, के. एल. राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिधिमान साहा, आर. आश्विन, हरभजनसिंग, अमित मिश्रा, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, वरुण आरोन, स्टुअर्ट बिन्नी.श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), लाहिरू थिरिमाने, कौशल सिल्वा, दिमुथ करुणारत्ने, कुमार संगकारा, दिनेश चांदीमल, उपुल थरंगा, जेहान मुबारक, कौशल परेरा, रंगाना हेराथ, दिलरुवान परेरा, थारिंडू कौशल, नुवान प्रदीप, धम्मिका प्रसाद, विश्वा फर्नांडो, दुष्मंता चामिरा (तंदुरुस्त ठरल्यास).(वृत्तसंस्था)