शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भारताचे नवी मुंबईतील सामने दिल्लीला हलविले

By admin | Updated: June 29, 2017 00:41 IST

केंद्रीय सरकारने केलेल्या आग्रहाला मान्य करताना फीफाने आगामी १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील यजमान भारताचे संघ

नवी दिल्ली : केंद्रीय सरकारने केलेल्या आग्रहाला मान्य करताना फीफाने आगामी १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील यजमान भारताचे संघ नवी दिल्लीमध्ये खेळविण्यास मान्यता दिली आहे. याआधीच्या आखलेल्या कार्यक्रमानुसार भारतीय संघाचे सर्व सामने नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळविण्यात येणार होते. अखिल भारतीय फुटबॉल संघटनने (एआयएफएफ) याआधी भारताच्या साखळी सामन्यांचे यजमानपद नवी मुंबईला दिले होते. मात्र, नंतर क्रीडा मंत्रालयाच्या दबावामुळे त्यांनी फीफाला या सामन्यांचे आयोजन दिल्लीमध्ये हलविण्याचे सांगितले. क्रीडा मंत्रालयानुसार राजधानी दिल्लीमध्ये यजमान संघाचे सामने खेळविण्यात आले पाहिजे. भारताचे सामने दिल्लीला हलविण्यात आलेल्या प्रक्रीयेला अंतिम स्वरुप देण्यात आले आहे का, याबाबत विचारले असता फीफाचे स्पर्धा प्रमुख जैमी यार्जा यांनी सांगितले की, ‘आम्ही स्पर्धेसाठी सर्वात फायदेशीर निर्णयांवर काम करत आहोत. आम्ही भारत सरकारच्या आग्रहाकडे अत्यंत गांभिर्याने लक्ष देत आहोत, कारण फीफा १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनामध्ये ते आमचे मुख्य सहकारी आहेत.’ एका विश्वासू सुत्राने दिलेल्या माहितीनुसार फीफाने ‘अ’ गटातील सामने दिल्लीला हलविण्यास प्रक्रीया सुरु केली असून ही प्रक्रीया अंतिम टप्प्यात आली आहे. (वृत्तसंस्था)६ ते २८ आॅक्टोबर दरम्यान भारतात १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धेतील सामने देशातील सहा शहरांमध्ये खेळविण्यात येतील.यजमान या नात्याने भारतीय संघाचा समावेश ‘अ’ गटात करण्यात येईल. तसेच, चार संघांचा समावेश असलेल्या या गटात भारत आघाडीचा ‘ए वन’ संघ असेल. ‘अ’ गटातील सामन्याचे यजमानपद नवी मुंबईकडे होते. परंतु, भारत सरकारच्या आग्रहानंतर दिल्ली आता या सामन्यांचे यजमानपद भूषवेल. अशा परिस्थितीमध्ये नवी मुंबईला ‘ब’ गटातील सामन्यांचे यजमानपद भूषविण्यात समाधान मानावे लागेल.