वन डे मालिका : श्रीलंकेविरुद्ध चौथा सामना आज
कोलकाता : पाच सामन्यांच्या मालिकेत लंकेकडून अद्याप प्रतिकाराचा सामना न करणा:या ‘टीम इंडिया’चा इरादा उद्या, गुरुवारी चौथा वन डे जिंकून ‘क्लीन स्वीप’ करण्याचा असेल.
लंकेने गोलंदाजीला धार आणण्यासाठी संघात अजंता मेंडिस याचा समावेश केला आहे. इतकेच नव्हे, तर फलंदाजी सुधारण्यासाठी उर्वरित दोन सामन्यांत लाहिरू तिरिमाने आणि दिनेश चांदीमल यांनाही संधी दिली. या खेळाडूंना संघात स्थान देण्यात पाहुण्यांनी उशीर केला, कारण भारताने मालिका 3-क् ने आधीच खिशात घातली. लंकेला आता दोन्ही सामने जिंकून प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान आहे.
भारताने नियमित कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या अनुपस्थितीत काही नव्या चेह:यांना संधी दिली. शिखर धवन आणि रवींद्र जडेजा यांच्या जागी रोहित शर्मा आणि रॉबिन उथप्पा यांना संधी दिली. धवनसोबत डावाची सुरुवात रोहित की अजिंक्य रहाणो यापैकी कोण करेल, हा उत्सुकतेचा विषय असेल. रोहितने जखमेतून सावरल्यानंतर संघात स्थान मिळविले. भारत ‘अ’ कडून सराव सामन्यात त्याने 142 धावांची खेळी केल्यानंतर पुन्हा एकदा चमकदार खेळ करीत निवडकत्र्याचे लक्ष वेधण्याचे रोहितचे प्रयत्न राहतील.
धवनने मागच्या सामन्यात विजयात मोठी भूमिका बजावली. त्याने या मालिकेत 283 धावा केल्या. निवडकत्र्यानी त्याला दोन सामन्यांसाठी विश्रंती देण्याचा निर्णय घेतला आहे. रोहितशिवाय फलंदाज आणि पार्टटाईम विकेटकिपर रॉबिन उथप्पा याने संघात स्थान मिळविल्याने फलंदाजी क्रमात कसा बदल होतो, हे पाहावे लागेल.
लंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज याने आपल्या फलंदाजांना धावा न काढल्याबद्दल चांगलेच धारेवर धरले आहे. कुमार संगकारा, उपुल थरंगा, धम्मिका प्रसाद आणि सूरज रणदिव यांना त्याने बाहेरचा रस्ता दाखवत नवे डावपेच आखले आहेत. मेंडिसच्या पुनरागमनामुळे गोलंदाजी भक्कम होणार आहे. भारतीय फलंदाजांनी आतार्पयतच्या सामन्यात लंकेच्या गोलंदाजांची बेमुर्वत पिटाई केली. पण, मेंडिसच्या सोबतीला असलेले तिरिमाने आणि चांदीमल हे किती आवर घालतात हे पाहावे लागेल. जयवर्धने उत्तम फॉर्ममध्ये असून, त्याने मागच्या सामन्यात 124 चेंडूंवर 118 धावा ठोकल्या होत्या.
भारताच्या गोलंदाजीबाबत बोलायचे झाल्यास मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांच्या अनुपस्थितीत उमेश यादव हा अपेक्षेनुरूप कामगिरी करू शकला. त्याने तीन सामन्यांत आठ गडी
बाद केले. डावखुरा अक्षर
पटेल यानेदेखील आशा पल्लवित केल्या. कर्ण शर्मा, विनय कुमार आणि केदार जाधव यांच्याकडूनही ब:याच आशा आहेत. कर्ण आणि विनय कुमार यांना उद्या संधी मिळू शकते. कर्ण शर्मा याने लेगस्पिनचा करिश्मा दाखवित सलगपणो बळी घेतले आहेत. ईडनच्या खेळपट्टीवर भारत तीन फिरकी गोलंदाजांना संधी देईल, अशी अपेक्षा आहे. (वृत्तसंस्था)
4भारत : विराट कोहली कर्णधार, अजिंक्य रहाणो, रोहित शर्मा, अंबाती रायुडू, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, धवल कुलकर्णी, विनयकुमार, स्टुअर्ट बिन्नी,
कर्ण शर्मा, अक्षर पटेल आणि केदार जाधव.
4श्रीलंका : अॅन्जेलो मॅथ्यूज कर्णधार, कुशल परेरा, तिलकर}े दिलशान, लाहिरु तिरिमाने, माहेला जयवर्धने, दिनेश चांदीमल, अशान प्रियांजन, निरोशन डिकलोवा, तिसारा परेरा, नुवान कुलसेकरा, लाहिरु गमागे, चतुरंगा डिसिल्व्हा, सकुगे प्रसन्ना, अजंता मेंडिस आणि शमिंडा इरांगा.
दोन सामन्यांतही कसर राखणार
नाही : कोहली
लंकेविरुद्ध अन्य दोन सामन्यांतही कसर राखणार नाही, असे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने स्पष्ट केले.‘ विश्वचषक पुढे असताना आम्हाला विजयाची सवय लावावी लागेल. आम्ही विजयी लय कायम राखू इच्छितो. लंकेविरुद्ध कुठलीही शिथिलता न बाळगता विजय मिळविणो हे मुख्य उद्दिष्ट असेल,’ असे कोहलीने सांगितले.