शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

भारताची पदकांची झोळी रिकामी

By admin | Updated: August 30, 2015 22:46 IST

जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारताच्या उरल्यासुरल्या आशा लागून राहिलेल्या मॅरेथॉनमध्ये देखील भारतीय खेळाडूंना रिकाम्या

बीजिंग : जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारताच्या उरल्यासुरल्या आशा लागून राहिलेल्या मॅरेथॉनमध्ये देखील भारतीय खेळाडूंना रिकाम्या हातानेच परतावे लागले. ओपी जैशा ने महिला मॅरेथॉनमध्ये वैयक्तिक सर्वश्रेष्ठ कामगिरी केल्यानंतरही तीला १८व्या स्थानी समाधान मानावे लागले. तर अनुभवी सुधा सिंगने १९ वे स्थान मिळवले. रविवारी पार पडलेल्या या स्पर्धेत भारतीय खेळाडूंना एकही पदक मिळवण्यात यश आले नाही.इंचिओन आशियाई स्पर्धेत १५०० मीटर स्पर्धेत कांस्य पदक पटकावणाऱ्या जैशाने २ तास ३४ मिनिट ४३ सेकंदाची वेल देत मॅरेथॉन पुर्ण केली. यावेळी तीने स्वत:चा २ तास ३७ मिनिट ३९ सेकंदाच्या राष्ट्रीय विक्रमामध्ये सुधारणा केली. जानेवारी महिन्यात झालेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये जैशाने हा विक्रम नोंदवला होता. त्याचवेळी जैशाच्या बरोबर मागे १९व्या स्थानी भारताच्या अनुभवी सुधा सिंगने स्थान मिळवले. तीने २ तास ३५ मिनिट ३५ सेकंदाची वेळ देताना शर्यत पुर्ण केली. विशेष म्हणजे यावेळी सुधाची कामगिरी देखील जैशाच्या आधीच्या राष्ट्रीय विक्रमापेक्षा वरचढ ठरली. दरम्यान, याआधीच रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या जैशानंतर सुधाने देखील या कामगिरीसह रिओचे तिकीट मिळवले. आॅलिम्पिक पात्रतेसाठी २ तास ४२ मिनिट अशी वेळ आवश्यक आहे.त्याचवेळी या आठवड्यात ३००० मीटर स्टिपलचेज मध्ये दोनवेळा धावल्याने भारताची अव्वल धावपटू ललिता बाबरने मॅरेथॉनमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. इथोपियाच्या मेयर दिबाबाने २ तास २७ मिनिट ३५ सेकंदाची जबरदस्त वेळ नोंदवून मॅरेथॉनच्या सुवर्ण पदकावर कब्जा केला. तर केनियाच्या हेला किप्रोप (२:२७.३६) आणि केनिया वंशाच्याच बहारीनचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या युनाइस जेपकिरुई (२:२७.३९) यांना अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.(वृत्तसंस्था)