शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

भारतासाठी अखेरचे ‘कूल’ नेतृत्व दिसणार

By admin | Updated: January 7, 2017 04:25 IST

एकदिवसीय मालिकेआधी भारत ‘अ’ आणि इंग्लंड इलेव्हन यांच्यामध्ये दोन एकदिवसीय सराव सामने खेळविण्यात येणार आहेत.

मुंबई : इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेआधी भारत ‘अ’ आणि इंग्लंड इलेव्हन यांच्यामध्ये दोन एकदिवसीय सराव सामने खेळविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, नुकताच आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिलेला महेंद्रसिंग धोनी पहिल्या सराव सामन्यात भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व करणार असून, भारतीय संघासाठी हे त्याचे अखेरचे नेतृत्व असेल. तर दुसऱ्या सराव सामन्यात मुंबईकर अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्व करेल.सराव सामन्यासाठी युवा व अनुभवी खेळाडूंची निवड करताना निवड समितीने सर्व पर्याय आजमाविण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे दुखापतीतून सावरलेल्या खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची ही सुवर्णसंधी असेल. या सराव सामन्यांसाठी नऊ महिन्यांनी संघात पुनरागमन केलेल्या युवराज सिंग आणि आशिष नेहरा यांचीही निवड करण्यात आली आहे. दोघांनीही गतवर्षी मार्चमध्ये झालेल्या विश्वचषक टी-२० स्पर्धेत भारतासाठी अखेरचा सामना खेळला होता. गेल्या वर्षी आयपीएल दरम्यान झालेल्या दुखापतीनंतर नेहराने ब्रिटनमध्ये शस्त्रक्रिया केली. तेव्हापासून त्याने कोणतेही स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेले नसून, तो सहा महिन्यांनंतर पुनरागमन करीत आहे.तसेच, इंग्लंडविरुध्दच्या कसोटी मालिकेत झालेल्या दुखापतीतून सावरलेल्या हार्दिक पांड्याची सरावासाठी भारत ‘अ’ संघात निवड झाली आहे. रणजी स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी केलेल्या दिल्लीकर युवा यष्टीरक्षक रिषभ पंतची रहाणेच्या नेतृत्वाखालील ‘अ’ संघात निवड झाली आहे. (क्रीडा प्रतिनिधी)>गेल्या दोन महिन्यांमध्ये धोनीने कोणतेही स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेले नाही. मुंबईतील ब्रेबोर्न स्टेडियमवर होणाऱ्या या दोन सराव सामन्यांपैकी पहिल्या १० जानेवारीला होणाऱ्या सामन्यात धोनी संघाचे नेतृत्व करेल. १२ जानेवारीला होणाऱ्या दुसऱ्या सराव सामन्यात रहाणे कर्णधारपदी असेल.>भारत ‘अ’ संघ :पहिला सराव सामना : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, मनदीप सिंग, अंबाती रायडू, युवराज सिंग, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, आशिष नेहरा, मोहित शर्मा आणि एस. कौल.दुसरा सराव सामना : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिषभ पंत, सुरेश रैना, दीपक हुड्डा, इशान किशन, शेल्डन जॅक्सन, विजय शंकर, शाहबाज नदीम, परवेझ रसूल, विनय कुमार, प्रदीप सांगवान आणि अशोक दिंडा.