शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
4
या देशाने आधीच भारतासोबत पंगा घेतला होता, आता पाकिस्तानचा उल्लेख करून ट्रम्प यांची स्तुती केली
5
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
6
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
7
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
8
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
9
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
10
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
11
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
12
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
13
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
14
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
15
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
16
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
17
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
18
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
19
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
20
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा

भारताचे ऐतिहासिक सांघिक सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 04:26 IST

भारतीय बॅडमिंटन संघाने सोमवारी तीन वेळेचा चॅम्पियन मलेशियावर प्रेक्षणीय विजय नोंदवित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत प्रथमच सुवर्ण पदक जिंकले.

गोल्ड कोस्ट: भारतीय बॅडमिंटन संघाने सोमवारी तीन वेळेचा चॅम्पियन मलेशियावर प्रेक्षणीय विजय नोंदवित राषष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत प्रथमच सुवर्ण पदक जिंकले. सात्त्विक रंकीरेड्डी-अश्विनी पोनप्पा या मिश्र जोडीने पेंग सून चान-लियू योग मोह यांचा २१-१४, १५-२१, २१-१५ ने पराभव करीत यशस्वी सुरुवात केली. किदाम्बी श्रीकांतने तीनवेळेचा आॅलिम्पिक रौप्य विजेता ली चोंग वेई याच्यावर सरळ गेममध्ये २१-१७, २१-१४ ने मात केली.पहिल्यांदा सहभागी झालेले रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या पुरुष दुहेरी जोडीला मात्र गोह आणि कियोनग टान या जोडीकडून १५-२१,२०-२२ अशा फरकाने पराभवाचे तोंड पहावे लागल्याने लढत रंगतदार अवस्थेत पोहोचली होती. तथापि अनुभवी सायना नेहवालने महिला एकेरीत सोनिया चिहचा २१-११,१९-२१,२१-९ असा पराभव करीत मलेशियाच्या आशेवर पाणी फेरले.सायनाच्या विजयानंतर एन. सिक्की रेड्डी- अश्विनी पोनप्पा या दुहेरीच्या जोडीला खेळण्याची गरजही भासली नाही. याआधी भारताने २०१० च्या नवी दिल्ली राष्टÑकुल स्पर्धेत सांघिक रौप्य आणि २००६ मध्ये कांस्य जिंकले होते. एकेरीचे सामने ११ एप्रिलपासून सुरू होतील.पीव्ही सिंधूफिट - गोपीचंदटाचेच्या दुखापतीमुळे सुवर्ण विजेत्या मिश्र संघाबाहेर राहिलेली आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आता तंदुरुस्त असून एकेरीत खेळण्यास सज्ज असल्याचे राष्ट्रीय कोच पुलेला गोपीचंद यांनी सांगितले. भारताने मलेशियाचा पराभव केल्यानंतर सिंधूच्या फिटनेसबद्दल विचारताच गोपीचंद म्हणाले,‘सिंधू आता ठीक आहे. ती एकेरीत खेळेल. सायना चांगला निकाल देत असल्यामुळे सिंधूला खेळविण्याची आम्ही जोखिम पत्करली नाही. सिंधूला हैदराबाद येथे सरावादरम्यान दुखापत झाली होती. या वेळी सिंधू खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी कोर्टवर उपस्थित होती.राष्ट्रकुल पदकतालिकादेश सुवर्ण रौप्य कांस्य एकूणआॅस्ट्रेलिया ३९ ३३ ३४ १०६इंग्लंड २२ २५ १६ ६३भारत १० ०४ ०५ १९न्यूझीलंड ०८ ०९ ०६ २३द. आफ्रिका ०८ ०५ ०५ १८

भारोत्तलनमध्ये ‘चंदेरी’ यशभारोत्तोलनमध्ये भारतीयांची शानदार कामगिरी कायम राहिली. सोमवारी या क्रीडा प्रकाराची सांगता सांगता प्रदीप सिंगने (१०५ किलो) रौप्यपदक पटकावित केली. भारताने भारोत्तोलनमध्ये पाच सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्यपदक अशी एकूण ९ पदकांची लयलूट केली. भारोत्तोलनमध्ये अखेरच्या दिवशी प्रदीप कुमारचे थोड्या फरकाने सुवर्णपदक हुकले. त्याने ३५२ किलो (१५२ + २०० किलो) वजन पेलताना दुसरे स्थान पटकावले.

टॅग्स :Commonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८