शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

भारताची पकड मजबूत

By admin | Updated: August 1, 2016 05:27 IST

लोकेश राहुलची नाबाद अर्धशतकी खेळी याच्या जोरावर भारताने शनिवारपासून विंडीजविरुद्ध प्रारंभ झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर वर्चस्व मिळवले.

किंग्स्टन : रविचंद्रन आश्विनचा (५ बळी) अचूक मारा व लोकेश राहुलची नाबाद अर्धशतकी खेळी याच्या जोरावर भारताने शनिवारपासून विंडीजविरुद्ध प्रारंभ झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर वर्चस्व मिळवले. आश्विनने ५२ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने १८ व्यांदा एका डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याची कामगिरी केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या यजमान विंडीज संघाचा डाव ५२.३ षटकांत १९६ धावांत संपुष्टात आला. ईशांत शर्मा (२-५३) व मोहम्मद शमी (२-२३) यांची आश्विनला योग्य साथ लाभली. प्रत्युत्तरात खेळताना भारताने दिवसअखेर पहिल्या डावात १ बाद १२६ धावांची मजल मारली होती. त्या वेळी भारताला विंडीजची पहिल्या डावातील धावसंख्या गाठण्यासाठी केवळ ७० धावांची गरज होती. त्या वेळी अर्धशतक झळकावणारा सलामीवीर लोकेश राहुल (७५) याला चेतेश्वर पुजारा (१८) साथ देत होता. राहुलने सलामीला शिखर धवनच्या (२७) साथीने ८७ धावांची भागीदारी केली. त्याआधी, विंडीज संघातर्फे जर्मेइन ब्लॅकवूड (६२ धावा, ७ चौकार, ४ षटकार) व मर्लोन सॅम्युअल्स (३७) यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांना छाप सोडता आली नाही. ब्लॅकवूड व सॅम्युअल्स यांनी चौथ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. (वृत्तसंस्था)शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताच्या ४८.५ षटकात १ बाद १४५ धावा झाल्या होत्या. आर. राहूल नाबाद ८६ तर चेतेश्वर पुजारा १८ धावांवर खेळत होता. राहुलने आघाडीला येऊन १८६ चेंडून ११ चौकार मारले होते.>शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताच्या ४८.५ षटकात १ बाद १४५ धावा झाल्या होत्या. आर. राहूल नाबाद ८६ तर चेतेश्वर पुजारा १८ धावांवर खेळत होता. राहुलने आघाडीला येऊन १८६ चेंडून ११ चौकार मारले होते.>भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याची गरज : ब्लॅकवूडकिंग्स्टन : पहिला डावात आम्हाला मोठी धावसंख्या उभारता आली नसली तरी रविवारी दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवत सामन्यात पुनरागमन करण्यास प्रयत्नशील असल्याचे मत विंडीजचा फलंदाज ब्लॅकवूडने व्यक्त केले. ब्लॅकवूडने कर्णधाराच्या निर्णयाचे समर्थन केले. ब्लॅकवूड म्हणाला, ‘सबिना पार्कची खेळपट्टी सुरुवातीला दोन तास फलंदाजांसाठी अनुकूल असते. ही खेळपट्टी थोडी वेगळी भासत असून या लढतीत गोलंदाजांना मदत मिळण्याची आशा आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय चुकीचा नव्हता, पण आम्हाला संयम दाखवित फलंदाजी करणे आवश्यक होते.’’ >विंडीजच्या निर्णयाचे आश्चर्य वाटले : आश्विनकिंग्स्टन : सबिना पार्कच्या हिरवळ असलेल्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी स्वीकारण्याच्या विंडीजच्या निर्णयाचे आश्चर्य वाटले, असे मत भारतीय फिरकीपटू आर. आश्विनने व्यक्त केले. आश्विनने पाच बळी घेत विंडीजचा डाव १९६ धावांत गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आश्विन म्हणाला, ‘नाणेफेक जिंकून विंडीजने प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतल्यामुळे आश्चर्य वाटले. सुरुवातीला तीन विकेट झटपट गमावल्यानंतर ब्लॅकवूडने प्रत्युत्तर दिल्यामुळे समतोल साधला गेला. ब्लॅकवूड व सॅम्युअल्स दरम्यानची भागीदारी संपुष्टात आल्यानंतर आम्हाला वर्चस्व मिळवता आले.’’

धावफलकवेस्ट इंडिज पहिला डाव :- क्रेग ब्रेथवेट झे. पुजारा गो. ईशांत ०१, आर. चंद्रिका झे. राहुल गो. शमी ०५, ड्वेन ब्राव्हो झे. कोहली त्रि. गो. ईशांत ००, मर्लोन सॅम्युअल्स झे. राहुल गो. आश्विन ३७, ब्लॅकवूड पायचित गो. आश्विन ६२, आर. चेज झे. धवन गो. शमी १०, एस. डोरिच झे. साहा गो. आश्विन ०५, जेसन होल्डर झे. राहुल गो. आश्विन १३, डी. बीशू झे. धवन गो. आश्विन १२, एम. क्युमिन्स नाबाद २४, एस. गॅब्रियल झे. कोहली गो. मिश्रा १५. अवांतर (१२). एकूण ५२.३ षटकांत सर्वबाद १९६. बाद क्रम : १-४, २-४, ३-७, ४-८८, ५-११५, ६-१२७, ७-१३१, ८-१५१, ९-१५८, १०-१९६. गोलंदाजी : ईशांत १०-१-५३-२, शमी १०-३-२३-२, आश्विन १६-२-५२-५, यादव ६-१-३०-०, मिश्रा १०.३-३-३८-१. भारत पहिला डाव :- के. एल. राहुल खेळत आहे ७५, शिखर धवन झे. ब्राव्हो गो. चेज २७, चेतेश्वर पुजारा खेळत आहे १८. अवांतर (६). एकूण ३७ षटकांत १ बाद १२६. बाद क्रम : १-८७. गोलंदाजी : गॅब्रियल ६-१-१८-०, क्युमिन्स ७-०-३१-०, होल्डर ८-२-२३-०, चेज ११-२-२८-१, बीशू २-०-१३-०, ब्रेथवेट ३-०-८-०.