नवी दिल्ली : फीफा विश्वचषक पात्रता फेरीतील विजयाच्या शोधात असलेला भारतीय संघ १२ नोव्हेंबरला होणाऱ्या गुआन विरुध्दच्या सामन्यासाठी सज्ज आहे. या महत्त्वपुर्ण सामन्यासाठी मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक स्टीफन कॉन्सटेनटाइन यांनी २५ सदसयांच्या भारतीय संघाची घोषणा केली. गुआन विरुध्दचा हा सामना बंगळुरु येथील श्री. किंतार्वा स्टेडियममध्ये खेळविण्यात येईल.जूनमध्ये गुआमविरुध्द त्यांच्या घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात भारताला १-२ असा पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आता भारतीय संघ आपल्या घरच्या मैदानावर कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान ‘ड’ गटातून आतापर्यंत आपले पाचही सामने गमावलेला भारतीय संघ याआधीच अंतिम सत्रात जागा मिळवण्याच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आठ गट विजेते आणि चार सर्वोत्तम उपविजेते असे एकूण १२ संघ २०१८ सालच्या फीफा विश्वचषक पात्रता फेरीच्या अंतिम सत्रासाठी आणि २०१९ साली होणाऱ्या एएफसी आशिया चषक फायनल्ससाठी पात्र ठरतील. भारतीय संघ :गोलरक्षक : सुब्रता पॉल, गुरप्रीत सिंग संधू, करणजीत सिंग, लक्ष्मीकांत कट्टीमनी.बचावपटू : अर्नब मोंडल, संदेश झिंगन, एबोर्लंग खोंगजी, लालचुआनमाविया, नारायण दास, प्रीतम कोटल, आॅगस्टीन फर्नांडिस, रॉबीन गुरुंग.मध्यरक्षक : युगेनसन लिंगदोह, केविन लोबो, सहनाज सिंग, प्रणय हल्दर, फ्रान्सिस फर्नांडिस, रोलिन बोर्गेस, रोमियो फर्नांडिस, बिकास जैरु आणि हरमनजोत सिंग खाबरा.आक्रमक : जेजे लालपेखलुआ, रॉबिन सिंग, सुनील छेत्री आणि होलीचरण नार्जरी.
भारताचा फुटबॉल संघ जाहीर
By admin | Updated: November 2, 2015 00:14 IST