शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
3
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
4
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
5
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
6
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
7
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
8
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
9
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
10
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
11
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
12
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
13
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
14
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
15
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
16
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
17
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
18
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
19
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
20
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी

भारताची आज ओमानशी लढत

By admin | Updated: June 11, 2015 08:49 IST

भारतीय फुटबॉल संघाचा ‘फिफा विश्वचषक स्पर्धे’च्या एएफसी पात्रता फेरीच्या दुसऱ्या सत्रातील पहिला सामना आज गुरुवारी ओमानबरोबर होणार आहे.

बंगलोर : भारतीय फुटबॉल संघाचा ‘फिफा विश्वचषक स्पर्धे’च्या एएफसी पात्रता फेरीच्या दुसऱ्या सत्रातील पहिला सामना आज गुरुवारी ओमानबरोबर होणार आहे. जागतिक क्रमवारीत खूप वरच्या क्रमांकावर असलेल्या ओमानबरोबरची लढत भारतासाठी कठीण असणार आहे.इंग्लडच्या स्टीफन कोरेंस्टेटाईन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने खूप चांगली कामगिरी केली आहे. मार्च महिन्यात झालेल्या पात्रता फेरीत भारताने नेपाळला पराभूत केले होते. मात्र, ओमानला पराभूत करण्यासाठी भारताला आपली सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे. जागतिक क्रमवारीत ओमान १०१ व्या क्रमांकावर असून, तो भारतापेक्षा ४० क्रमांकानी पुढे आहे.भारतीय संघाने या सामन्यासाठी खूप चांगली तयारी केली आहे. मागील शनिवारी येथे भारतीय सैन्याने आयोजित केलेल्या शिबिरातही भारतीय संघाने सहभाग घेतला होता. ओमानविरुद्धच्या सामन्यात सुब्रत पालऐवजी अर्णव मंडल संघाचे नेतृत्व करणार असल्याची माहिती कोरेस्टेंटाईन यांनी दिली.ओमानविरुद्ध आजपर्यंत झालेल्या चार सामन्यांत भारताने एक विजय दोन पराभव व एक सामना बरोबरीत सोडविला आहे. फेबु्रवारी २०१२ मध्ये दोन्ही संघांची शेवटची लढत झाली होती. हा सामना ओमानने ५-० अशा गोल फरकाने जिंकला होता. पहिल्या सत्रात नेपाळ विरुद्धचा पहिला सामना भारताने २-० असा, तर दुसरा सामना गोलशून्य बरोबरीत सुटला होता. ओमानला २०१४ च्या पात्रता फेरीत आलेल्या अपयशाच्या कटू आठवणी विसरण्यासाठी उद्याचा सामना महत्त्वाचा आहे.कोरेंस्टेटाईनने अनुभवी खेळाडूंऐवजी युवा खेळाडूंवर विश्वास दाखविला आहे. २६ संभाव्य खेळाडूंत त्यांनी जॅकीचंद सिंग, सी. के. विनित, धनपाल गणेश व शहनाज सिंग यांना स्थान दिले आहे. भारताचे लक्ष्य मधल्या फळीच्या कामगिरीकडे असणार आहे. ओमानच्या आक्रमणाची धार कमी करण्यासाठी अर्नव मंडल व सहकाऱ्यांवर मोठी जबाबदारी असणार आहे. स्थानिक स्पर्धेतील चांगल्या कामगिरीच्या जोरावर शहनाज व युजेंसन लिंगडोह यांची निवड होण्याची शक्यता आहे. गोल करण्याची जबाबदारी रॉबिन सिंग व सुनील छेत्री यांच्यावर असणार आहे.ओमानला त्यांच्या अल ओवैसी व मोहम्मद अल शैयबी यांची उणीव भासणार आहे. हे दोन्ही खेळाडू दुखापतींमुळे बाहेर आहेत. ओमानची सर्व मदार अली सलीम अल नाहर याच्यावर असणार आहे. या गटात भारत व ओमानशिवाय इराण, तुर्कमेनिस्तान व गुआम यांचा समावेश आहे. यातील दोन संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.(वृत्तसंस्था)