ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - पहिल्या एकदिवसीय सामन्यात सपाटून मार खाल्ल्यानंतर भारतीय संघाची स्थिती दुस-या सामन्यातही बिकट असून भारताने अवघ्या ९५ धावांत ३ गडी गमावले आहेत. रहाणे(१२), धवन (१) आणि रायडू (३२) पटापट तंबूत परतले असून आता भारताची मदार कोहली (२३) व रैनावर (१३) आहे. वेस्ट इंडिजतर्फे टेलर, बेन व सॅमीने प्रत्येकी १ बळी टिपला.
विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून गणल्या जाणाऱ्या भारतीय संघाला कचखाऊ फलंदाजीमुळे पहिल्या सामन्यात १२४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. विंडीज प्लेअर्स असोसिएशन आणि विंडीज बोर्ड यांच्यादरम्यान वेतनाच्या मुद्द्यावरील वादामुळे विंडीज संघ मालिकेवर बहिष्कार टाकण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना पहिला सामना खेळण्यात आला. कॅरेबियन खेळाडूंनी हा वाद विसरून चमकदार कामगिरी केली.