शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

याच महिन्यात होईल भारताच्या प्रशिक्षकाची निवड

By admin | Updated: February 11, 2017 00:45 IST

या महिन्यातच भारताच्या १७ वर्षांखालील फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड करण्यात येईल, अशी घोषणा अखिल भारतीय फुटबॉल संघटनेचे

नवी दिल्ली : या महिन्यातच भारताच्या १७ वर्षांखालील फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड करण्यात येईल, अशी घोषणा अखिल भारतीय फुटबॉल संघटनेचे (एआयएफएफ) अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केली. आगामी १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी यजमान भारताची कसून तयारी सुरू आहे.या विश्वकप स्पर्धेचे यजमानपद भूषवित असलेल्या एआयएफएफने स्पर्धेच्या केवळ ९ महिन्यांआधीच निकोलई अ‍ॅडम यांना संघाच्या प्रशिक्षकपदावरून डच्चू दिला होता. १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी शुभंकराच्या अनावरणवेळी पटेल यांनी म्हटले की, ‘आम्ही बायचुंग भुतिया व अभिषेक यांना एका महिन्यासाठी संघासोबत राहण्यास सांगितले आहे. यामुळे नवा प्रशिक्षक आणि खेळाडूंमध्ये ताळमेळ साधण्यास मदत होईल.’ अधिकृत शुभंकरचे झाले अनावरण...१७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेची रंगत रंगण्यास २३८ दिवस शिल्लक राहिले असताना शुक्रवारी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये या स्पर्धेचा अधिकृत शुभंकर ‘खेलियो’चे अनावरण झाले. एआयएफएफ अध्यक्ष पटेल, केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या दिमाखदार सोहळ्यात या शुभंकरचे अनावरण करण्यात आले. या वेळी ‘खेलियो’नामक बिबट्याचे शुभंकर म्हणून अनावरण झाले. चित्त्याप्रमाणे दिसणारा हा बिबट्या दुर्मीळ होत असून, हा प्रामुख्याने हिमालयमधील तलहटी आणि दक्षिण पूर्व आशिया येथे दिसतो.‘खेलियो’ला जगासमोर अधिकृत शुभंकर म्हणून आणणे, जागतिक फुटबॉलमध्ये आमच्यासाठी आणखी एक मोठे पाऊल आहे. भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या प्रचारासाठी खेलियो संपूर्ण देशाचा दौरा करून सर्व देशवासीयांना प्रेरित करेल.- प्रफुल्ल पटेल, अध्यक्ष, एआयएफएफ