शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
3
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
4
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
5
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
6
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
7
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
8
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
9
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
10
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
11
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
12
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
13
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
14
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
15
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
16
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
17
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
18
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
19
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
20
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश

भारताला विजयाच्या 'हॅट्ट्रिक'ची संधी

By admin | Updated: July 7, 2016 19:08 IST

दिग्गज फलंदाज विराट कोहलीच्या नेतृत्वात आणि नवे कोच अनिल कुंबळे यांच्या मार्गदर्शनात वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेला भारतीय संघ चार सामन्यांची कसोटी मालिका जिंकून मालिका विजयाची हॅट्ट्रिक साधू

ऑनलाइन लोकमत

कोलकाता, दि. ७  : दिग्गज फलंदाज विराट कोहलीच्या नेतृत्वात आणि नवे कोच अनिल कुंबळे यांच्या मार्गदर्शनात वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेला भारतीय संघ चार सामन्यांची कसोटी मालिका जिंकून मालिका विजयाची हॅट्ट्रिक साधू इच्छितो.भारताने १९५३ पासून विंडीजमध्ये ४५ कसोटी सामने खेळले. त्यात पाच जिंकले, १६ हरले आणि २४ सामने अनिर्णीत राहिले. भारत विंडीज यांच्यात १९४८ पासून आतापर्यंत एकूण ९० कसोटी सामने झाले. त्यात १६ भारताने आणि ३० सामने विंडीजने जिंकले तर ४४ सामने अनिर्णीत राहिले. भारत सध्या विंडीजमध्ये चार सामने खेळणार आहे. या सामन्यांसह भारताने खेळलेल्या कसोटी सामन्यांची संख्या ४९९ होणार आहे.

भारताने पहिल्यांदा १९५२-५३ साली विंडीजचा दौरा केला. तेव्हापासून कॅरेबियन भूमीत दहा मालिका खेळल्या आहेत. त्यातील तीन जिंकल्या आणि सात गमविल्या. मागच्या दोन्ही मालिका मात्र भारताने जिंकल्या. सध्याची मालिका खिशात घातल्यास मालिका विजयाची हॅट्ट्रिक साधली जाईल. टीम इंडियाने विंडीजमध्ये २००६ साली चार सामन्यांची मालिका १-० ने आणि २०११ मध्ये तीन सामन्यांची मालिका १-० ने जिंकली होती. त्याआधी भारतीय संघाने अजीत वाडेकर यांच्या नेतृत्वात १९७१ मध्ये पाच सामन्यांची मालिका १-० अशी जिंकली होती.

२००६ मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व राहुल द्रविडकडे आणि २०११ मध्ये महेंद्रसिंग धोनीकडे होते. १९७५-७६मधील चार सामन्यांच्या मालिकेत तसेच २००२ च्या पाच सामन्यांच्या मालिकेत प्रत्येकी एक सामना भारताने जिंकला होता. १९७१ च्या ६ ते १० मार्च या कालावधीत झालेल्या पोर्ट आॅफ स्पेनच्या दुसऱ्या कसोटीत भारत सात गड्यांनी जिंकला. याच सामन्यात महान सुनील गावस्करचे पदार्पण झाले. आॅफ स्पिनर श्रीनिवास व्यंकटराघवन यांनी दुसऱ्या डावात ९५ धावांत पाच बळी घेत भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. मालिकेतील चार सामने अनिर्णीत संपले.

१९७५-७६ मध्ये पोर्ट आॅफ स्पेनच्या तिसऱ्या कसोटीत ४०३ धावांचे लक्ष्य गाठताना ४ बाद ४०६ धावा करीत विजय साजरा केला. गावस्कर १०२, गुंडप्पा विश्वनाथ ११२, मोहिंदर अमरनाथ ८५ आणि बृजेश पटेलने नाबाद ४९ धावांचे विजयात योगदान दिले.या ऐतिहासिक विजयाच्या २७ वर्षानंतर २००२ मध्ये भारताला पोर्ट आॅफ स्पेनमध्ये सौरभ गांगुलीच्या नेतृत्वात ३७ धावांनी तिसरा विजय नोंदविता आला. पहिल्या डावात सचिनने शानदार ११७ तर गांगुली आणि लक्ष्मण यांनी दुसऱ्या डावात क्रमश: ७५ आणि ७४ धावा ठोकल्या. लक्ष्मणने पहिल्या डावातही नाबाद ६९ धावांचे योगदान दिले. जवागल श्रीनाथ आणि आशिष नेहरा यांनी

प्रत्येकी तीन गडी बाद करीत भारताचा शानदार विजय साकार केला. २००६ मध्ये किंग्स्टनच्या सबिना पार्कमध्ये भारताने ४९ धावांनी विजय साजरा केला. कर्णधार द्रविडने पहिल्या डावात ८१ आणि दुसऱ्या डावात ६८ धावा केल्या. सध्याचे कोच अनिल कुंबळे यांनी दुसऱ्या डावात ७८ धावांत सहा गडी बाद केले. त्याआधी हरभजनने १३ धावांत अर्धा संघ बाद केला होता.२०११ मध्ये सबिना पार्कवर धोनीच्या नेतृत्वात भारताने ६३ धावांनी विजय नोंदविला. रैनाने पहिल्या डावात ८२ आणि द्रविडने दुसऱ्या डावात ११२ धावा ठोकल्या. प्रवीण कुमार आणि ईशांत शर्मा यांनी प्रत्येकी सहा बळी घेत सामना फिरविला होता. याच सामन्यात सध्याचा कर्णधार विराट कोहली याने कसोटी पदार्पण केले. पाचव्या स्थानावर आलेल्या विराटने पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात १५ धावा केल्या. कर्णधार या नात्याने पाच वर्षानंतर मालिका जिंकण्याची जबाबदारी विराटच्याच खांद्यावर आली. तो कसा विजय खेचून आणतो, याकडे लक्ष लागले आहे.