शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘वन-डे’तही भारताचे आव्हान कडवे : मॉर्गन

By admin | Updated: January 10, 2017 01:47 IST

भारताविरुद्ध आगामी तीन वन-डे सामन्यांची मालिका आमच्यासाठी कडवे आव्हान ठरणार असल्याचे मत मर्यादित षटकांच्या

मुंबई : भारताविरुद्ध आगामी तीन वन-डे सामन्यांची मालिका आमच्यासाठी कडवे आव्हान ठरणार असल्याचे मत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये इंग्लंडचे नेतृत्व करणाऱ्या इयोन मॉर्गन याने व्यक्त केले. मालिकेपूर्वी संघाला आज, मंगळवारी आणि १२ जानेवारीला सराव सामने खेळण्याची संधी मिळणार असल्यामुळे त्याने आनंद व्यक्त केला. भारत ‘अ’ संघाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सराव सामन्याच्या पूर्वसंध्येला बोलताना मॉर्गन म्हणाला, ‘विदेशात खेळताना वेगळेच आव्हान असते आणि अशा आव्हानांना सामोरे जाण्यास प्रत्येक खेळाडू उत्सुक असतो. भारत हे खेळण्यासाठी आणि मालिका विजय साकारण्यासाठी चांगले स्थान आहे. कारण येथे स्थानिक संघ चांगली कामगिरी करतो, असा अनुभव आहे.’इंग्लंडला येथे यापूर्वी वन-डे सामन्यांच्या तीन मालिकांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. २००८-०९ आणि २०१२ मध्ये इंग्लंडला ०-५ ने, तर २०१३ मध्ये २-३ ने पराभव स्वीकारावा लागला होता. इंग्लंड आणि भारत यांच्यादरम्यान तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेला १५ जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. त्यानंतर उभय संघांदरम्यान तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. दरम्यान, मॉर्गन याने धोनीच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. धोनीने अलीकडे संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला. मॉर्गन म्हणाला, ‘महेंद्रसिंग धोनी निश्चितच चांगला कर्णधार होता. तो प्रदीर्घकाळ संघाचा कर्णधार होता. २०११ च्या विश्वकप स्पर्धेत त्याचे नेतृत्व उल्लेखनीय ठरले होते. आकडेवारी सर्वकाही स्पष्ट करणारी आहे.’कसोटी कर्णधार विराट कोहली आता सर्वच प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार आहे. मॉर्गन पुढे म्हणाला, ‘विराट कसोटी संघाचे नेतृत्व करीत असल्यामुळे त्याचा त्याला लाभ मिळाला. विराट निश्चितच चांगला खेळाडू आहे; पण जोपर्यंत कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यातील बारकावे कळत नाही.’इंग्लंड संघ चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेपर्यंत पूर्णपणे पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार आहे. इंग्लंडच्या यजमानपदाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जून महिन्यात होणार आहे. आगामी मालिका अधिक महत्त्वाची असल्याचे मॉर्गन म्हणाला. (वृत्तसंस्था)