शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

LIVE- कानपूर कसोटीवर भारताची पकड, न्यूझीलंडसमोर 434 धावांचं आव्हान

By admin | Updated: September 25, 2016 14:27 IST

एतिहासीक 500 व्या कसोटीवर चौथ्या दिवशी भारतीय संघाने आपली पकड मजबूत केली आहे. उपहारासाठी खेळ थांबला तेव्हा भारताकडे 308 धावांची आघाडी

कानपूर : एतिहासीक 500 व्या कसोटीवर चौथ्या दिवशी भारतीय संघाने आपली पकड मजबूत केली आहे. दुस-या डावात भारताने 377 धावांवर डाव घोषीत केला. त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी 434 धावांची आवश्यकता आहे. भारताकडून रविद्र जडेजा(50) आणि रोहित शर्माने(62) आक्रमक खेळ केला आणि भारताची आघाडी वाढवली . दोघेही अर्धशतक करून नाबाद राहिले.   

त्यापुर्वी आज सकाळी भारताने कालच्या 1 बाद 159 वरून पुढे खेळण्यास सुरूवात केली. सकाळपासूनच भारतीय फलंदाजांनी आक्रमक खेळ केला . झटपट धावा गोळा करण्याच्या प्रयत्नात मुरली विजय(76), पुजारा(78) आणि कोहली(18) बाद झाले.  न्यूझिलंडच्या  सॅंटनर,सोढी आणि क्रेग यांनी अनुक्रमे तिघांना बाद केले.  उपहारानंतर खेळ सुरू झाल्यावर अजिंक्य रहाणेची(40) शिकार सॅंटनरने केली.

डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा (५-७३) आणि आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विन (४-९३) यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने न्यूझीलंडचा पहिला डाव २६२ धावांत गुंडाळल्यानतंर मुरली विजय व चेतेश्वर पुजारा यांच्या नाबाद अर्धशतकांच्या जोरावर दुसऱ्या डावात १ बाद १५९ धावांची मजल मारली. कानपूरमध्ये खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात यजमान भारतीय संघाने एकूण २१५ धावांची आघाडी घेतली असून तिसऱ्या दिवसअखेर आपली पकड मजबूत केली आहे. तिसऱ्या दिवशी फिरकीला अनुकूल ग्रीन पार्कच्या खेळपट्टीचा लाभ घेताना जडेजाने (७३ धावांत ५ बळी) एका षटकात तीन गड्यांसह एकूण पाच बळी घेतले. आश्विनने (९३ धावांत ४ बळी) चार गडी बाद करीत त्याला योग्य साथ दिली. न्यूझीलंडचा पहिला डाव ९५.५ षटकांत २६२ धावांत संपुष्टात आला. पहिल्या डावात ३१८ धावांची मजल मारणाऱ्या भारताने ५६ धावांची आघाडी घेतली. न्यूझीलंडतर्फे कर्णधार केन विल्यम्सनने सर्वाधिक ७५ धावा फटकावल्या, तर टॉम लॅथमने ५८ धावांची खेळी केली. भारताने त्यानंतर सलामीवीर मुरली विजय (नाबाद ६४) व पुजारा (नाबाद ५०) यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या १९७ धावांच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर दिवसअखेर एकूण २१५ धावांची आघाडी घेतली होती. विजयने त्याआधी लोकेश राहुलसोबत (३८) सलामीला ५२ धावांची भागीदारी करीत भारताला चांगली सुरुवात करून दिली. विजयने १५२ चेंडूंना सामोरे जाताना ७ चौकार व १ षटकार ठोकला, तर पुजाराने ८० चेंडूंच्या खेळीमध्ये ८ चौकार ठोकले. के. एल. राहुलला फिरकीपटू ईश सोढीने माघारी परतवले. त्याआधी, कालच्या १ बाद १५२ धावसंख्येवरून पुढे खेळताना न्यूझीलंड संघाने आज १०३ धावांच्या मोबदल्यात ९ विकेट गमावल्या. अखेरच्या पाच विकेट केवळ ७ धावांत गेल्या. सकाळच्या सत्रात भारतीय फिरकीपटूंनी सुरुवातीला २९ चेंडूंमध्ये तीन फलंदाजांना माघारी परतवत न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकलले. आश्विनने लॅथम (५८) व विल्यम्सन (७५) यांना माघारी परतवले, तर जडेजाने रॉस टेलर (००) व ल्यूक राँची (३८) यांना तंबूचा मार्ग दाखवला. दिल्लीमध्ये मुंबईविरुद्ध खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात शतकी खेळी करणारा राँची व सँटेनर (३२) यांनी पाचव्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी करीत डाव सावरण्याच्या आशा निर्माण केल्या होत्या. जडेजाने राँचीला पायचित करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. उपाहारानंतर न्यूझीलंडचा डाव २६२ धावांत संपुष्टात आला.(वृत्तसंस्था)विल्यम्सनची विकेट टर्निंग पॉर्इंट : जडेजाआश्विनने केन विल्यम्सनची घेतलेली विकेट टर्निंग पॉर्इंट ठरला, अशी प्रतिक्रिया न्यूझीलंडच्या डावात पाच बळी घेणारा डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाने दिली. आश्विनने न्यूझीलंडच्या कर्णधाराला क्लीन बोल्ड केले. शनिवारी तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर पत्रकार परिषदेत बोलताना जडेजा म्हणाला, ‘विल्यम्सनमध्ये प्रदीर्घ काळ फलंदाजी करण्याची क्षमता आहे, याची आम्हाला कल्पना आहे. त्याला बाद करणे महत्त्वाचे होते. सकाळच्या सत्रात चार बळी घेतल्यामुळे चित्र बदलले.’’ विल्यम्सन बाद झालेल्या चेंडूबाबत बोलताना जडेजा म्हणाला, ‘‘तो चांगला चेंडू होता. बॅट व पॅडच्या गॅपमधून चेंडू यष्टीवर आदळला.’’ सकाळच्या सत्रापूर्वी जडेजा प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यासोबत चर्चा करीत असताना दिसला. याबाबत बोलताना जडेजा म्हणाला, ‘‘या दिग्गज फिरकीपटूकडून मोलाच्या टिप्स मिळाल्या.’’ आव्हान पेलण्यास सज्ज असलेले खेळाडू संघात आहेत : वॉटलिंगकानपूर : यजमान भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात २१५ धावांची आघाडी घेतली असल्यामुळे पाहुण्या न्यूझीलंड संघाची पुनरागमन करण्याची आशा धूसर झाली आहे. पण, यष्टिरक्षक बी. जे. वॉटलिंगने मात्र संघाची लढवय्यी वृत्ती यजमान संघापुढे आव्हान निर्माण करण्यास प्रेरित करेल, अशी आशा व्यक्त केली. न्यूझीलंड संघाला चौथ्या डावात फलंदाजी करावी लागल्यामुळे त्यांची वाटचाल खडतर झाली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना वॉटलिंग म्हणाला, ‘‘आमच्या संघात काही लढवय्ये खेळाडू असून, आम्हाला आव्हानाला सामोरे जाणे आवडते. सध्या आमच्यावर दडपण असले तरी प्रतिस्पर्धी संघाला दडपणाखाली आणण्याचे उपाय शोधावे लागतील. सध्या आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही रविवारी नक्कीच वर्चस्व गाजविण्यात यशस्वी ठरू.’’वॉटलिंग पुढे म्हणाला, ‘‘आजचा दिवस आमच्यासाठी खडतर होता. कामगिरीत सुधारणा करणे आवश्यक आहे. आम्ही परिस्थितीसोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत असून, बळी घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत.’’ मी वैयक्तिक व संघाच्या कामगिरीवर समाधानी आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही लय गमावली होती, पण आज सूर गवसल्यामुळे आघाडी घेण्यात यश आले. आम्ही योजनाबद्ध खेळ केला. सुरुवातीला चेंडूची लकाकी कायम होती. त्यामुळे त्यावर पकड मिळवता येत नव्हती. चेंडू जुना झाल्यानंतर पकड मिळवता आली व चेंडू वळायला लागले. पाहुण्या संघाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखण्यात यशस्वी ठरल्यामुळे आनंद झाला.- रविचंद्रन आश्विन, भारतीय फिरकीपटू धावफलकभारत पहिला डाव : ३१८. न्यूझीलंड पहिला डाव : मार्टिन गुप्टील पायचित गो. यादव २१, टॉम लॅथम पायचित गो. आश्विन ५८, केन विल्यम्सन त्रि. गो. आश्विन ७५, रॉस टेलर पायचित गो. जडेजा ००, ल्यूक राँची पायचित गो. जडेजा ३८, मिशेल सँटेनर झे. साहा गो. आश्विन ३२, बी. जे. वॉटलिंग झे. व गो. आश्विन २१, मार्क क्रेग पायचित गो. जडेजा ०२, इश सोढी पायचित गो. जडेजा ००, ट्रेंट बोल्ट झे. रोहित गो. जडेजा ००, नील वॅगनर नाबाद ००. अवांतर : १५. एकूण : ९५.५ षटकांत सर्व बाद २६२; गडी बाद क्रम : १-३५, २-१५९, ३-१६०, ४-१७०, ५-२१९, ६-२५५, ७-२५८, ८-२५८, ९-२५८, १०-२६२; गोलंदाजी : शमी ११-१-३५-०, यादव १५-५-३३-१, जडेजा ३४-७-७३-५, आश्विन ३०.५-७-९३-४, विजय ४-०-१०-०, रोहित १-०-५-०. भारत दुसरा डाव : लोकेश राहुल झे. टेलर गो. सोढी ३८, मुरली विजय खेळत आहे ६४, चेतेश्वर पुजारा खेळत आहे ५०. अवांतर : ७. एकूण : ४७ षटकांत १ बाद १५९. गडी बाद क्रम : १-५२; गोलंदाजी : बोल्ट ५-०-११-०, सँटेनर १३-५-३३-०, क्रेग ११-१-४८-०, वॅगनर ८-३-१७-०, सोढी ७-२-२९-१, गुप्टील ३-०-१४-०.