अॅडिलेड : विश्वचषकाचा सहयजमान आॅस्ट्रेलियाला संभाव्य दावेदारीत वरचे स्थान देण्यात येत आहे; पण याच संघाचा कर्णधार मायकेल क्लार्क याच्या मते, विश्वविजयाचा मार्गात टीम इंडियाचा मोठा अडथळा असेल. आॅस्ट्रेलिया दौऱ्यात भारत विजयापासून दूर राहिला; पण क्लार्क भारताला कमकुवत मानण्यास तयार नाही. शनिवारी पत्रकारांशी बोलताना क्लार्क म्हणाला, ‘‘विश्वचषकात भारत बलाढ्य तसेच धोकादायी संघ ठरू शकतो. धोनी मॅचविनर असून, त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने मोठ्या स्पर्धांमध्ये धमाल केली. विश्वचषकात नव्या उमेदीने हा संघ उतरणार असल्याने अन्य संघांसाठी धोक्याची घंटा ठरेल.’’जखमांमुळे त्रस्त असलेला क्लार्क दीर्घकाळानंतर मीडियापुढे आला. तो म्हणाला, ‘‘भारतीय संघात काही उणिवा आहेत. एक तर आत्मविश्वासाचा अभाव आहे. येथे काही महिन्यांपासून खेळण्याचा त्यांना लाभ व्हावा; पण त्यासाठी नव्या दमाने खेळावे लागेल.’’
विजयाच्या मार्गात भारत मोठा अडथळा : क्लार्क
By admin | Updated: February 8, 2015 01:12 IST