शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

फिफा रँकिंगमध्ये भारताची मोठी झेप

By admin | Updated: April 6, 2017 20:20 IST

कम्बोडिया तसेच मॅनमारविरुद्ध विजयाची नोंद करताना भारताच्या पुरुष फुटबॉल संघाने फिफाच्या ताज्या क्रमवारीत मोठी झेप घेत १०१ वे स्थान पटकवले आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 6 : कम्बोडिया तसेच मॅनमारविरुद्ध विजयाची नोंद करताना भारताच्या पुरुष फुटबॉल संघाने फिफाच्या ताज्या क्रमवारीत मोठी झेप घेत १०१ वे स्थान पटकवले आहे. गेल्या २० वर्षांतील ही सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. भारतीय संघ मागच्या महिन्यात १३२ व्या स्थानी होता. कम्बोडियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय सामन्यात ३-२ ने आणि मॅनमारविरुद्ध १-० ने विजय नोंदविताच भारताला ३१ स्थानांचा लाभ झाला.

याआधी १९९४ साली भारतीय संंघाने ९४ व्या, १९९३ मध्ये ९९ व्या, आणि १९९६ मध्ये १०० वे स्थान मिळविले होते. अ.भा. फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि महासचिव कुशाल दास यांनीसंघाचे कौतुक करीत यशाचे श्रेय खेळाडू आणि सहयोगी स्टाफला दिले. नवे रँकिंग मिळविल्यानंतर भारतीय संघाला ७ जून रोजी पहिला आंतरराष्ट्रीय सामना लेबनॉनविरुद्ध खेळायचा आहे. त्यानंतर एएफसी आशिया चषक पात्रता फेरीत १३ जूनला घरच्या मैदानावर किर्गिस्तानविरुद्ध सामना खेळावालागेल.

देदीप्यमान कामगिरीभारताने गेल्या दोन वर्षांत खूप सुरेख कामगिरी केली आहे. या दरम्यान भूतानविरुद्ध अनधिकृत सामन्यासह १३ सामन्यात ११ विजयांची नोंद केली. भारतीय संघाने ३१ गोल नोंदविले.

सांघिक प्रयत्नांचे फळराष्ट्रीय संघाचे कोच स्टीफन कॉन्स्टेनटाईन यांनी या कामगिरीला सांघिक प्रयत्नांचे फळ संबोधले. नवे खेळाडू खेळविणे आणि प्रतिस्पर्धा तयार करणे ही मोठी प्रक्रिया असून आमचा संघ योग्य दिशेने प्रयत्नात असल्याचे मला समाधान असल्याचे त्यांनी सांगितले. कॉन्स्टेनटाईन हे फेब्रुवारी २०१५ ला दुसऱ्यांदा कोच बनले. त्यावेळी भारत १७१ व्या स्थानावर होता. मार्च २०१५ मध्ये संघ १७३ व्या स्थानावर घसरला. पण त्यानंतर सलग चांगल्या कामगिरीसह रँकिंग सुधारण्याचा त्यांंनी प्रयत्न केला.