शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रिओ क्रीडाग्राममध्ये होतेय भारतीयांची एन्ट्री

By admin | Updated: July 29, 2016 03:15 IST

आॅलिम्पिकला काही दिवस शिल्लक राहिले असताना आता भारतीय संघातील खेळाडूंचा छोट्या छोट्या समूहाने रिओमध्ये प्रवेश होऊ लागला आहे. बहुतेक खेळाडू छोट्या छोट्या समूहाने

रिओ : आॅलिम्पिकला काही दिवस शिल्लक राहिले असताना आता भारतीय संघातील खेळाडूंचा छोट्या छोट्या समूहाने रिओमध्ये प्रवेश होऊ लागला आहे. बहुतेक खेळाडू छोट्या छोट्या समूहाने क्रीडानगरीत पोहोचले असून, इतर खेळाडूही पुढील काही दिवसांत रिओमध्ये दाखल होतील. सकाळी न्याहरीच्यावेळी सभागृहामध्ये भारतीय संघाचे राकेश गुप्ता यांनी आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष बाक यांची भेट घेतली. बाक हे यावेळी आॅलिम्पिक व्हिलेजला भेट देण्यासाठी आले होते. गुप्ता यांच्याशी संवाद साधताना बाक यांनी भारतीय खेळाडूंच्या तयारीविषयी माहिती जाणून घेतली. यावेळी बाक यांनी, ‘‘भारतीय संघाची तयारी कशी सुरू आहे? यावेळी मला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. भारतीय खेळाडू पहिले पोहचले हे पाहून आनंद वाटला. आॅलिम्पिकसाठी भारतीयांना मी शुभेच्छा देतो,’’ असे सांगितेले. आॅलिम्पिक व्हिलेज बाबतीत गुप्ता यांनी सांगितले की, ‘‘येथे खूप प्रमाणात शाकाहारी खाद्यपदार्थांची सोय करण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत आणखी खेळाडू येथे सहभागी होणार असून यामध्ये आणखी वाढ करण्यात येईल. येथे राहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या रुम्स चांगल्या असून अंतिम काम अजूनही सुरू आहे. पुढील दोन दिवसांत आॅलिम्पिक व्हिलेज पूर्णपणे सज्ज असेल. भारतीय संघ यजमान ब्राझील संघाशेजारीच असून, येथे उजव्या बाजूला अप्रतिम जलतरण तलाव आहे. आॅलिम्पिक प्लाझा व जिमदेखील जवळच असून, येथील वातावरणाशी खेळाडू जुळवून घेत आहेत.’’ (वृत्तसंस्था)हे खेळाडू पोहोचले रिओला... जीतू राय, प्रकाश नानजप्पा, गुरप्रीत सिंग, कायनन चेनाई, मानवजित संधू, अपूर्वी चंदेला आणि आयोनिका पॉल (सर्व निशानेबाज), खुशबीर कौर, सपना पुनिया, संदीप कुमार आणि मनीष राव (चालण्याची शर्यत), मनप्रीत कौर (गोळाफेक), शिव थापा आणि मनोज कुमार (बॉक्सर).