शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भारतीयांचा पुन्हा एकदा क्लीन स्वीप; प्रकाश, अमनप्रीत, जितू चमकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:16 IST

प्रकाश नांजप्पा, अमनप्रीतसिंग आणि जितू राय यांनी राष्ट्रकुल नेमबाजीच्या चौथ्या दिवशी ५० मीटर पिस्तूल प्रकारात क्लीन स्वीप करीत तिन्ही पदक जिंकली.

गोल्ड कोस्ट : प्रकाश नांजप्पा, अमनप्रीतसिंग आणि जितू राय यांनी राष्ट्रकुल नेमबाजीच्या चौथ्या दिवशी ५० मीटर पिस्तूल प्रकारात क्लीन स्वीप करीत तिन्ही पदक जिंकली.प्रकाशने २२२.४ गुणांसह सुवर्ण, अमनप्रीतने रौप्य आणि जितूने कांस्य जिंकले. पुरुषांच्या ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात आॅलिम्पिक कांस्य विजेता गगन नारंग याला रौप्य आणि स्वप्निल कुसाले याला कांस्य पदक मिळाले. त्याआधी महिलांच्या २५ मीटर एअर पिस्तूल प्रकारात अन्नूराजसिंग हिने कांस्य जिंकले. विशेष म्हणजे याआधी भारतीय पिस्तूल नेमबाजांनी दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारातही क्लीन स्वीप केले होते. शाहजार रिझवीने सुवर्ण, ओकांरसिंग याने रौप्य आणि जितू रायने कांस्य जिंकले होते.अनुभवी नेमबाज ४१वर्षीय प्रकाशने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले आहे. याआधी त्याला २०१४ साली झालेल्या आशियाई क्रीडा व २०१३ साली झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेच्या १० मीटर प्रकारात कांस्य पदकावर समाधान मानावे लागले होते.दरम्यान, स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी आपली चमकदार कामगिरी कायम ठेवली आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी हिना सिध्दूने १० मीटर एअर पिस्तूल गटात सुवर्ण जिंकले होते. (वृत्तसंस्था)