शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

भारतीय महिला हॉकी संघाचा दिमाखदार विजय

By admin | Updated: April 10, 2017 01:25 IST

एकतर्फी झालेल्या उपांत्य सामन्यात धमाकेदार कामगिरी करताना भारताच्या महिला हॉकी संघाने बेलारुसचा ४-०

वेस्ट वँकुवर : एकतर्फी झालेल्या उपांत्य सामन्यात धमाकेदार कामगिरी करताना भारताच्या महिला हॉकी संघाने बेलारुसचा ४-० असा फडशा पाडून हॉकी वर्ल्ड लीग स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राची अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात भारताचा सामना चिलीविरुद्ध होईल. चिलीने उरुग्वेला २-१ असा धक्का देत आगेकूच केली आहे.या विजयासह भारताच्या महिलांनी जून - जुलै महिन्यात होणाऱ्या महिला हॉकी विश्व लीग स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील जागाही निश्चित केली आहे. विशेष म्हणजे, ही स्पर्धा महिला विश्वचषक २०१८ स्पर्धेसाठी पात्रता स्पर्धाही असेल. या सामन्यात सुरुवातीपासूनच भारतीय महिलांनी दबदबा राखण्यास सुरुवात केली. बेलारुसने सुरुवातीलाच ४था आणि ९व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला होता. मात्र, जबरदस्त संरक्षण करताना भारताने बेलारुसला यश मिळवून दिले नाही. यानंतर संपूर्ण सामन्यावर एकहाती वर्चस्व राखताना भारतीयांनी दिमाखदार विजय मिळवला. गुरजीत कौरने १३व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावत भारताला आघाडीवर नेले. यानंतर २०व्या मिनिटाला कर्णधार राणीने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करून भारताची आघाडी २-० अशी केली. या दोन गोलच्या जोरावर आक्रमक पवित्रा घेत भारताने आपले वर्चस्व राखले. ४०व्या मिनिटाला राणीने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवताना अप्रतिम मैदानी गोल करून संघाची आघाडी ३-० अशी भक्कम केली. तसेच, ५८व्या मिनिटाला गुरजीतने पुन्हा एकदा पेनल्टी कॉर्नरवर  भारताला यश मिळवून देत संघाच्या विजयावर ४-० असा शिक्कामोर्तब केला. (वृत्तसंस्था)