शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय महिला अंतिम सामन्यासाठी सज्ज

By admin | Updated: February 21, 2017 00:31 IST

आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आपला प्रवेश निश्चित केल्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका कोणत्याही दडपणाशिवाय

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आपला प्रवेश निश्चित केल्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका कोणत्याही दडपणाशिवाय विश्वचषक पात्रता फेरीच्या अंतिम सामन्यात एकमेकांविरुद्ध लढतील. विश्वचषक स्पर्धेत जागा निश्चित झाल्याने दोन्ही संघ कोणत्याही दडपणाशिवाय आपला सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करतील. पात्रता स्पर्धेच्या सुपरसिक्स फेरीच्या गुणतालिकेत भारतीय महिला अव्वल स्थानी राहिल्या, तर दक्षिण आफ्रिकेने दुसरे स्थान पटकावले. दहा संघांच्या या स्पर्धेत या दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच चमकदार कामगिरी केली. तसेच, या स्पर्धेतील अव्वल चार संघांनी केवळ विश्वचषक स्पर्धेत प्रवेश मिळवला नसून आयसीसी महिला चॅम्पियनशिप स्पर्धेतही आपली जागा निश्चित केली आहे. भारत व दक्षिण आफ्रिकेव्यतिरिक्त श्रीलंका आणि पाकिस्तान यांनी विश्वचषक व चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. त्याचप्रमाणे, बांगलादेश आणि आयर्लंड यांनी स्पर्धेत सुपरसिक्स फेरीत धडक मारून पुढील चार वर्षांसाठी आपला एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा कायम राखला आहे. स्पर्धेत भारतीय संघ अपराजित असून, दक्षिण आफ्रिकेनेही केवळ भारताचा अपवाद वगळता इतर सर्व प्रतिस्पर्ध्यांना नमवले आहे. अंतिम सामन्याविषयी भारताची कर्णधार मिताली राजने सांगितले, ‘‘आमची गोलंदाजी, खासकरून फिरकी गोलंदाजी चांगली होत आहे.