शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

हॉकीमध्ये भारतीय महिला अर्जेंटिनाकडून पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 03:13 IST

भारतीय महिला हॉकी संघाला महिला विश्वकप हॉकी लीग सेमीफायनलच्या अखेरच्या साखळी लढतीत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या

जोहान्सबर्ग : भारतीय महिला हॉकी संघाला महिला विश्वकप हॉकी लीग सेमीफायनलच्या अखेरच्या साखळी लढतीत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अर्जेंटिनाविरुद्ध ०-३ ने पराभव स्वीकारावा लागला. अर्जेंटिनातर्फे रोशियो सांचेस (दुसरा मिनिट), मारिया ग्रानाटो (१४ वा मिनिट) आणि नोएल बिरियोनुएव्हो (२५ वा मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. रोशियोने दुसऱ्याच मिनिटाला नोंदवलेल्या गोलच्या बळावर अर्जेंटिनाने आघाडी घेतली. भारतीय गोलकिपर सविताने सुरुवातीपासून अनेकदा अर्जेंटिनाचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडले. सविताने रोशियोचा पहिला फटका अडवला, पण दुसऱ्या फटक्यावर मात्र तिने गोल नोंदवला. त्यानंतर भारतीय संघाला बरोबरी साधण्याची संधी होती. नमिता टोप्पोच्या पासवर वंदना कटारियाने गोल नोंदविण्याचा केलला प्रयत्न प्रतिस्पर्धी गोलकिपरने हाणून पाडला. सविताने पहिल्या १५ मिनिटांमध्ये चारदा अप्रतिम बचाव केला. अर्जेंटिनाने पहिला पेनल्टी कॉर्नर सहाव्या मिनिटाला मिळवला, पण नमिताने प्रतिस्पर्धी संघाचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडले. मारिया ग्रानाटोने १४ व्या मिनिटाला गोल नोंदवित अर्जेंटिनाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. भारताला २३ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण राणीचा फटका प्रतिस्पर्धी गोलकिपरने रोखला. अर्जेंटिनाला २५ व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोक मिळाला, त्यावर नोएलने गोल केला. अर्जेंटिनाला ३४ व्या मिनिटाला सलग पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण भारतीय गोलकि पर रजनीने त्यावर उत्कृष्ट बचाव केला.(वृत्तसंस्था) मध्यंतरानंतर सविताच्या स्थानी रजनीने गोलकिपरची भूमिका बजावली. अखेरच्या क्वार्टरमध्ये भारतीय बचावपटूंनी अर्जेंटिनाला गोल नोंदविण्याची संधी दिली नाही. भारताला मंगळवारी उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. (वृत्तसंस्था)