केपटाऊन : भारताच्या दृष्टिहीन क्रिकेट संघाने उत्कृष्ट कामगिरी करताना ब्लाईंड क्रिकेट वर्ल्डकपच्या (बीसीडब्ल्यूसी) फायनलमध्ये पाकिस्तानला 5 गडय़ांनी धूळ चारून अजिंक्यपदाचा मान मिळविला़
फायनलमध्ये पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 4क् षटकांत 7 बाद 389 धावांर्पयत मजल मारली होती़ या विशाल स्कोरचा पाठलाग करताना भारतीय संघाने 39़4 षटकांत 5 गडय़ांच्या बदल्यात हे लक्ष्य पूर्ण करीत चौथ्या वर्ल्डकपचा किताब आपल्या नावे केला़
स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने श्रीलंकेविरुद्ध, तर पाकिस्तानने इंग्लंडविरुद्ध शानदार विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केला होता़ या स्पर्धेत भारत, पाकव्यतिरिक्त श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश होता़
भारतात दृष्टिहीन क्रिकेटपटूंची संख्या 22 हजार एवढी आहे, तर पाकिस्तानात 4 हजार आणि दक्षिण आफ्रिकेत केवळ 2क्क् खेळाडूंचा समावेश आह़े (वृत्तसंस्था)
तेंडुलकरकडून टीमचे अभिनंदन
नवी दिल्ली : ब्लाईंड क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पाकिस्तानवर मात करीत जेतेपद मिळविणा:या भारतीय संघाचे महान माजी फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने अभिनंदन केले आह़े तेंडुलकरने टि¦टरवर लिहिले की, वर्ल्डकप जिंकणा:या भारतीय क्रिकेट संघाचे हार्दिक अभिनंदन! पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा! या वर्ल्डकपमध्ये कर्णधार शेखर नाईकच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात 17 खेळाडू आणि तीन अधिका:यांचा समावेश होता़
सोनोवाल यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार
नवी दिल्ली : पाकिस्तानला धूळ चारून ब्लाईंड क्रिकेट वर्ल्डकपचे जेतेपद मिळविणा:या भारतीय संघातील खेळाडूंचा केंद्रीय क्रीडामंत्री सरबानंद सोनोवाल यांच्या हस्ते सन्मान केला जाणार आह़े सोनोवाल यांनी वर्ल्डकपला रवाना होण्यापूर्वी या संघास यशासाठी शुभेच्छा दिल्या होत्या, तसेच त्यांना मदतीचे आश्वासनही दिले होत़े मायदेशी परतल्यानंतर हा सत्कार कार्यक्रम आयोजित केला जाईल़