ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. ४ : आयसीसीच्या एकदिवसीय, कसोटी आणि टी २० क्रमवारीत भारतीय संघाची घसरण झाली आहे. आयसीसीने आपली वार्षिक क्रमवारी आज जाहीर केली आहे. भारताची टी२०च्या प्रथम क्रमांकावरुन दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे तर एकदिवसीय क्रमवारीत ४ थ्या स्थानी आणि कसोटीत प्रथम क्रमांकावरुन दुसऱ्या स्थानी स्थानी घसरण झाली आहे.
टी २० मध्ये फ्रथम क्रमांकवरुन दुसऱ्या स्थानी -
आयसीसीच्या टी२० क्रमवारीत भारताची दुसऱ्या स्थानी धसरण झाली आहे. न्युझीलंड सध्या प्तथम क्रमांकावर विराजमान झाले आहे. टी २० मध्ये भारत आणि न्युझीलंडचे गुण १३२ आहेत. पण दशअंश अंकाच्या फरकाने भारताची दुसऱ्या स्थानी घसरण झाली. भारतानंतर या कर्मारीत विश्वचषक विजेता वेस्ट इंडिज संघाने क्रमांक पटकावला आहे.
एकदिवसिय क्रमवारीतही घसरण -
गेल्या वर्षी एकदिसिय विश्वचषक जिंकणारा ऑस्ट्रेलियाचा संघ १२४ गुणासह एकदिवसिय क्रमवारीत प्रथम क्रमांकावर विराजमान आहे. न्युझीलंड ११३ गुणासह दुसऱ्या, दक्षिण आफ्रिका तिसऱ्या आणि भारत चौथ्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजने पाकिस्तानला पछाडत अंतिम ८ मध्ये स्थान बनवले आहे. त्यामुले पाकिस्तानची ९ व्या स्थानी घसरण झाली आहे. बांगलादेश ७, इंग्लड ६ आणि श्रीलमका ५ व्या स्थानी आहेत.
कसोटीमध्ये भारत दुसऱ्या स्थानी, आफ्रिका ६व्या स्थानी घसरण -
भारतीय संघावर सहा गुणांनी आघाडी घेत ऑस्ट्रेलियाने आयसीसी कसोटी मानांकनात अव्वलस्थानी झेप घेतली आहे. आता भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे. भारत पाकिस्तानच्या केवळ एका गुणाने पुढे आहे. पाकिस्तानला वार्षिक अपडेटचा फायदा झाला; कारण त्यांचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०१२-१३ मध्ये झालेल्या पराभवाचा विचार करण्यात आला नाही, तर २०१४-१५ मधील श्रीलंकेकडून झालेल्या ०-२ अशा पराभवाचा केवळ ५० टक्के फरक पडला आहे. वार्षिक अपडेटमध्ये दक्षिण आफ्रिका संघ १७ गुणांनी मागे असला तरी ते तिसऱ्या स्थानावरुन सहाव्या स्थानी घसरले आहेत. वार्षिक अपडेटचा वेस्ट इंडिजवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. ते आठव्या स्थानी पोहचले. मात्र, त्यांचे गुण ७६ वरून ६५ झाले आहेत; कारण त्यांनी न्यूझीलंड, बांगलादेश आणि झिम्बाब्वेविरुद्ध २०१२ आणि २०१३ मध्ये मिळवलेल्या विजयाचे गुण त्यातून वगळण्यात आले आहेत. बांगलादेश संघ नवव्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यातील २९ गुणांचे अंतर आता केवळ ८ गुणांवर आले आहे.