शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय खेळाडूंनी केली निराशा

By admin | Updated: August 29, 2015 00:55 IST

जागतिक अ‍ॅथलेटीक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या २० किमी अंतराच्या चालण्याच्या शर्यतीमध्ये लियू होंग हिने महिलांच्या गटात बाजी मारताना चीनला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले.

बीजिंग : जागतिक अ‍ॅथलेटीक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या २० किमी अंतराच्या चालण्याच्या शर्यतीमध्ये लियू होंग हिने महिलांच्या गटात बाजी मारताना चीनला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. शुक्रवारी चालण्याच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी निराशा केली. महिलांच्या २० किमी चालण्याच्या स्पर्धेत खुशबीर कौर ३७व्या स्थानावर राहिली. तर नियम मोडल्याने सपना अपात्र ठरली. महिलांच्या २० किमी चालण्याच्या शर्यतीमध्ये यजमान चीनचे एकहाती वर्चस्व राहिले. सुवर्ण व रौप्य पदकावर कब्जा करताना चीनी खेळाडूंनी या स्पर्धेवर दबदबा राखला. लियूने १ तास २७ मिनिटे ४५ सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्ण पटकावले. त्याचवेळी दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या चीनच्याच लू शिऊझीने देखील हीच वेळ नोंदवत शर्यत पुर्ण केली. मात्र काही शतांशने मागे राहिलेल्याने तीला रौप्य पदाकावर समाधान मानावे लागले. तर युक्रेनच्या ओलियान्नोवस्का ल्युडमायला हिने १ तास २८ मिनिटे १ सेकंदाची वेळ देत कांस्य पदक कमावले. दरम्यान २२ वर्षीय अमृतसरच्या खुशबीरने याआधीच रिओ आॅलिम्पिकचे तिकिट मिळवले आहे. तीने गतवर्षी झालेल्या इंचिओन आशियाई स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते.डेकॅथलॉनमध्ये जागतिक विक्रमवीर इटोनने १०० मीटरमध्ये १०.२३ सेकंद तर लांब उडीमध्ये ७.८८ मीटरची झेप घेऊन आघाडी घेतली. विशेष म्हणजे कॅनडाचे प्रतिनिधित्व करणारी इटोनची पत्नी थेईसेन इटोनने महिलांच्या हेप्टाथलॉनमध्ये रौप्य पदकाची कमाई केली. (वृत्तसंस्था)सपना ठरली अपात्र...महिलांच्या २० किमी चालण्याच्या स्पर्धेत भारताची अन्य अ‍ॅथलिट सपना हिने नियम मोडल्याने ती संपुर्ण शर्यतीमध्ये पहिल्या टप्प्यानंतर अपात्र ठरली. पहिले ५ किमीचे अंतर २४ मिनिट ५ सेकंदामध्ये पार केल्यानंतर ती अपात्र ठरली.